• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पंतप्रधान मोदींची यंदाची दिवाळी काश्मीरमध्ये, राजौरीतील सैनिकांसोबत उजळणार दिवे

पंतप्रधान मोदींची यंदाची दिवाळी काश्मीरमध्ये, राजौरीतील सैनिकांसोबत उजळणार दिवे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो - Shutterstock)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो - Shutterstock)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi to celebrate Diwali with soldiers at Rajauri in Jammu and Kashmir) यंदाची दिवाळी जम्मू काश्मीरमधील राजौरी येथील सैनिकांसोबत साजरी करणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi to celebrate Diwali with soldiers at Rajauri in Jammu and Kashmir) यंदाची दिवाळी जम्मू काश्मीरमधील राजौरी येथील सैनिकांसोबत साजरी करणार आहेत. पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे प्रत्येक (Every Diwali with soldiers) दिवाळी सैनिकांसोबत साजरी करतात. देशातील वेगवेगळ्या भागात तैनात असणाऱ्या सैनिकांकडे ते जातात आणि प्रत्येक दिवाळीला देश तुमच्यासोबत आहे, असा संदेश देतात. सैन्याच्या हालचालींना वेग पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दिल्लीहून श्रीनगर मार्गे राजौरीत दाखल होणार असून तिथे जवानांसोबत दिवाळीचा आनंद घेणार आहेत. यावेळी सैनिकांना ते मार्गदर्शन करणार असून त्यांच्यासाठी मिठाई आणि फराळ घेऊन जाणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये शोधमोहिम वेगाने राबवण्यात येत आहे. दहशतवादी लपून बसण्याच्या सर्व संभाव्य ठिकाणांवर धाडी टाकण्यात येत असून कुठलाही घातपात होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. प्रत्येक दिवाळी सैनिकांसोबत जेव्हा देशातील प्रत्येकजण आपापल्या घरी दिवाळी साजरी करत असतो, तेव्हा सीमेवरचा जवान मात्र डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करत असतो. त्यामुळे दिवाळीदिवशी आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या साथीनं दिवाळी साजरी करण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2014 पासूनच राबवत आहेत. आतापर्यंत त्यांनी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यात तैनात असणाऱ्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली आहे. हे वाचा-भारतात कोळशाचा वापर पूर्ण थांबेल? जाणून घ्या काय असेल भविष्यातील स्थिती राजौरीमध्ये दुसरी दिवाळी पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे दिवाळी साजरी करण्यासाठी दुसऱ्यांदा राजौरीत जात आहेत. यापूर्वी 2019 सालीदेखील त्यांनी राजौरीतील जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात सध्या दहशतवादी कारवाया वाढल्या असून भारतीय सैनिक त्या कारवाया हाणून पाडत असल्याचं चित्र आहे. पुँछ जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चममकीत भारतीय जवान शहीद झाल्याची घटना नुकतीच घडली होती. तर शनिवारी राजौरीत झालेल्या स्फोटात एक सैनिक आणि एका अधिकाऱ्यानेदेखील आपले प्राण गमावले होते. या पार्श्वभूमीवर सैनिकांचं मनोबल उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजौरीत जाऊन त्यांची भेट घेणार आहेत.
  Published by:desk news
  First published: