Home /News /maharashtra /

तुम्ही पण आंदोलनं आणि निदर्शनं करा, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

तुम्ही पण आंदोलनं आणि निदर्शनं करा, ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

 ऑक्टोबरमध्ये तिसरी कोरोनाची लाट येऊ शकते' असा अंदाज शिंगणे यांनी व्यक्त केला.

ऑक्टोबरमध्ये तिसरी कोरोनाची लाट येऊ शकते' असा अंदाज शिंगणे यांनी व्यक्त केला.

ऑक्टोबरमध्ये तिसरी कोरोनाची लाट येऊ शकते' असा अंदाज शिंगणे यांनी व्यक्त केला.

    राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 06 ऑगस्ट : एकीकडे या ना त्या मुद्यावरून भाजपच्या (bjp) नेत्यांनी आंदोलनं करून महाविकास आघाडी सरकारच्या (mva government) नाकीनऊ आणले आहे. पण, अशातच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे (dr rajendra shingne) यांनी 'कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलनं करा, निदर्शनं करा' असा अजब सल्ला दिला. त्यावेळी अनेकांच्या भुया उंचावल्या. बुलडाणा (buldhana) जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे राष्ट्रवादी (ncp) पक्षाचा मेळावा झाला. या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येत उपस्थिती होती. या कार्यक्रमात संबोधित करताना राजेंद्र शिंगणेंनी कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला. युवराजच्या एक्स-गर्लफ्रेंडसोबत लिएंडर पेसचं अफेयर! Romantic Photo Viral 'जरी आपलं सरकार असलं आणि आपल्या मना विरोधी काम होत असेल तर आपल्या सत्तेत असलेल्या सरकारचा विचार न करता चक्क रस्त्यावर उतरून आंदोलनं करा, असा सल्लाच शिंगणे यांनी दिला. आता राज्याच्या मंत्र्याकडूनच अशा प्रकारचा सल्ला तेही आपल्याचं सरकार विरोधात दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे . मोबाइलमध्ये लेकीचा बलात्काराचा VIDEO पाहून बापाने उचललं धक्कादायक पाऊल तसंच, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात मंत्री डॉ.शिंगणे यांनी पुनरुच्चार केला. ऑक्टोबरमध्ये तिसरी कोरोनाची लाट येऊ शकते' असा अंदाज शिंगणे यांनी व्यक्त केला. 'दुसऱ्या लाटेत कोरोनाने बाधित झालेल्या रुग्णापेक्षा ही लाट दीड पटीने वाढलेली असेल. त्यामुळे राज्य सरकारकडून त्या परीने काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि कोरोनावर मात करण्यासाठी सर्वच उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आपण सतर्क राहायला पाहिजे, असंही शिंगणे म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या