बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) बराच काळ मोठ्या पडद्यापासून लांब आहे, पण ती अनेकवेळा चर्चेत असते. बहुतेक करून तिच्या रिलेशनशीपवरून. मागच्या काही महिन्यांपासून ती दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेससोबत दिसत आहे. किमने रविवारी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पेससोबतचा (Leander Paes) आपला एक फोटो शेयर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने कपलचा इमोजीही वापरला आहे. यानंतर या दोघांच्या रिलेशनशीपच्या चर्चा सुरू झाल्या. Kim Sharma Instagram)
या फोटोमध्ये किम शर्मा एका पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. तर लिएंडर पेसने निळ्या रंगाचा टीशर्ट घातला होता. या फोटोमध्ये किम कॅमेराच्या दिशेने बघत आहे, तर लिएंडरचं लक्ष किमकडे आहे. (Kim Sharma Instagram)
मागच्या बराच काळापासून किम शर्मा आणि लिएंडर पेस यांच्या अफेयरच्या चर्चा सुरू आहेत, पण दोघांनीही आपल्या नात्याविषयी अधिकृतपणे काहीही सांगितलं नाही. या दोघांना मुंबईमध्ये अनेकवेळा एकत्र पाहिलं गेलं. याचे फोटोही सोशल मीडियावर समोर आले. या आठवड्यात दोघं मुंबईच्या एका जिममध्येही दिसले. (cine rocks instagram)
याआधी किम आणि लिएंडर पेस मागच्या महिन्यात गोव्यातल्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवताना दिसले होते. गोव्यात असताना त्यांनी आपले काही फोटो शेयर केले होते. यातल्या एका फोटोमध्ये लिएंडर पेसने किम शर्माला मिठी मारली होती.
लिएंडर पेसने याआधी रिया पिल्लईसोबत लग्न केलं होतं, पण नंतर दोघं वेगळे झाले. रिया संजय दत्तची आधीची पत्नी होती. तर किम आधी हर्षवर्धन राणेसोबत रिलेशनशीपमध्ये होती. (Kim Sharma/ Leander Paes Instagram)
किमचं नाव भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगसोबतही जोडलं गेलं होतं. 2003 साली किम आणि युवराज यांच्यातल्या अफेयरच्या बातम्या समोर आल्या होत्या. 4 वर्ष हे दोघं रिलेशनशीपमध्ये राहिले, यानंतर दोघं वेगळे झाले. (Kim Sharma Instagram)
युवराजसोबत ब्रेक अप झाल्यानंतर किमने 2010 साली बिजनेसमन अली पुंजानीसोबत लग्न केलं, यानंतर ती केनियाला गेली. तिचं लग्न फार काळ टिकलं नाही आणि ती परत भारतात आली. (Kim Sharma Instagram)