मास्को, 5 सप्टेंबर : कोणत्याही वडिलांसाठी त्याची मुलगी ही जगातील सर्वात सुंदर परी असते. तिला दु:खात तो कधी पाहू शकत नाही. पण जेव्हा जवळची कोणी त्या छोट्या परीला दुखावतो, तेव्हा सर्व मर्यादा ओलांडण्याची त्याची तयारी असते. असंच एक प्रकरण रशियातून (Russia) समोर आले आहे. येथे एका वडिलांनी आपल्या 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Minor Rape) केल्याचा आरोप असलेल्या मित्राला चाकूने भोसकून ठार मारले.
मित्राच्या फोनमध्ये बलात्काराचा व्हिडीओ
डेली स्टार मधील एका वृत्तानुसार, रशियाच्या रॉकेट इंजिन कारखान्यात काम करणारा 34 वर्षीय व्याचेस्लाव आपला 32 वर्षीय मित्र ओलेग स्विरिडोव्हसोबत दारू पित होता. त्यानंतर व्याचेस्लावने अचानक ओलेगचा मोबाईल घेतला आणि तो पाहू लागला. या दरम्यान व्याचेस्लावची नजर मोबाईलमधील एका व्हिडिओवर पडली. जेव्हा त्याने हा व्हिडीओ ऑन केला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो व्हिडिओ व्याचेस्लावच्या मुलीचा होता, जिच्यावर ओलेग बलात्कार करीत होता.
आपल्या मुलीवर होणाऱ्या बलात्काराचा व्हिडिओ पाहून वडिलाचा पारा पढला आणि तो ओलेगशी वाद घालू लागला. नशेच्या अवस्थेत व्याचेस्लाव काही करण्यापूर्वी ओलेग तेथून पळून गेला. यानंतर व्याचेस्लावने पोलिसांना संपूर्ण प्रकरण सांगितले आणि ओलेगविरुद्ध त्याच्या मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. पण व्याचेस्लाव ही फसवणूक आणि लेकीवर केलाला अत्याचार विसरू शकत नव्हता. त्यामुळे ओलेगला शोधून त्याला शिक्षा करण्याचं ठरवलं आणि त्याच्या शोधासाठी निघाला.
हे ही वाचा-विद्यार्थिनींच्या कपड्यांवरुन मुख्याध्यापकाचं घृणास्पद वक्तव्य; शिक्षक दिनी FIR
मिळालेल्या माहितीनुसार, एके दिवशी व्याचेस्लाव हा ओलेगला सापडला. आणि व्याचेस्लावने ओलेगला चाकूने भोसकून ठार मारले. काही दिवसांनंतर पोलिसांना जवळच्या जंगलातून ओलेगचा मृतदेह सापडला. यानंतर, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि पुराव्यांच्या आधारे व्याचेस्लावला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे ओलेगच्या मोबाईलवर आणखी बऱ्याच मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ होते, ज्यातून तो पूर्वीही बलात्कार करून न घाबरता फिरत होता. म्हणूनच आज रशियातील नागरिक त्या वडिलांच्या बाजूने उभी आहे.
रशियन नागरिकांचं म्हणणं आहे की, हत्येचा खटला त्या व्यक्तीविरुद्ध चालवला जाऊ नये. कारण त्याने आपल्या मुलीचे तसेच समाजातील इतर मुलांचे संरक्षण केले आहे. त्याच वेळी, काही नागरिकांचं म्हणणँ आहे की, व्याचेस्लाव हत्यारा नाही. त्याने आपल्या मुलीचे आणि आमच्या मुलांचेही संरक्षण केले आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा असू नये. व्याचेस्लावच्या समर्थनार्थ अनेक रशियन पत्रकारही बाहेर आले आहेत आणि त्यांना शिक्षा न देण्याची मागणीही केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Rape