Home /News /maharashtra /

Yavatmal : पूजा कावळे हत्याकांडाचा उलगडा; पतीच निघाला हत्येचा मास्टरमाईंड

Yavatmal : पूजा कावळे हत्याकांडाचा उलगडा; पतीच निघाला हत्येचा मास्टरमाईंड

पूजा हत्याकांडाचा अखेर उलगडा; पतीच निघाला हत्येचा मास्टरमाईंड

पूजा हत्याकांडाचा अखेर उलगडा; पतीच निघाला हत्येचा मास्टरमाईंड

Yavatmal Crime news: यवतमाळमधील पूजा हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे. या प्रकरणात पूजाचा पतीच हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं उघड झालं आहे.

यवतमाळ, 21 नोव्हेंबर : यवतमाळ जिल्ह्याच्या (Yavatmal district) दिग्रस जवळ 4 दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा मृत देह आढळून आला होता. त्यानंतर या परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असता मन सुन्न करणारे सत्त्ये उजेडात आले आहे. या घटनेत मृत महिलेचा पतीचं हत्याकांडाचा सूत्रधार निघाला आहे. (Yavatmal Pooja Kavale murder case solved) शेतशिवारात आढळला होता मृतदेह शेलोडी येथील पूजा अनिल कावळे (Pooja Kavale) ही विवाहित तरुणी 10 नोव्हेंबरला पुण्यासाठी निघाली मात्र ती पुण्याला पोहोचलीच नाही. त्यामुळे मृत महिलेला भावाने या प्रकरणी हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली. त्यानंतर 16 नोव्हेंबरला दिग्रस तालुक्यातील सावंगा शेतशिवारात एका अनोळखी महिलेचे प्रेत काही नागरिकांना दिसून आले. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना दिली असता पोलीस पथक घटानास्थळी दाखल झाले आणि महिलेची ओळख पटविण्यासाठी हालचाल सुरू केली. वाचा : दिवस-रात्र मेहनत करून स्वप्नातील बांधलं घर; गृहप्रवेशानंतर पती-पत्नीने सोडला जीव हत्येच्या तपासासाठी 4 पथके या बाबतची माहिती सर्वत्र देण्यात आली, हरवलेल्या महिलेच्या प्रकरणातील फिर्यादी भोजराज पंजाबराव वानखडे यांनाही या बाबतची माहिती दिली. त्यावरून मृत महिला ही पूजा अनिल कावळे असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तिचा खून झाल्याचे प्रथमदर्शी लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. या तपासासाठी स्थानिक गुन्हे सायबर सेलसह चार पथकांची मदत घेण्यात आली. वाचा : लग्नात घेतले 70 लाख कॅश आणि 50 तोळं सोनं; कांड करून नवरदेव अमेरिकेला फरार घटनास्थळी एकही पुरावा नसल्याने होते आव्हान घटनास्थळावर सबळ पुरावे आढळून न आल्याने हे प्रकरण अतिशय क्लिष्ट झाले. त्यामुळे पोलिसांसमोर उलगडा लावण्याचे मोठे आव्हान उभे झाले. अशातच पोलीस पथकाने अतिशय सय्यम बाळगून मृत महिलेच्या बाबतची गुप्त माहिती घेण्यास सुरुवात केली असता हळूहळू या प्रकरणाचा उलगडा होण्यास सुरुवात झाली. सर्व चौकशी अंती हा गुन्हा चार संशयित आरोपीने केल्याचं उघड झाले. उज्वल पंढरी नगराळे, गौरव रामभाऊ राऊत, अभिषेक बबन म्हात्रे या तिघांना एकाच वेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून जी माहिती मिळाली ती सर्वांनाच अवाक करून ठेवणारी आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मृत महिलेचा पती अनिल रमेश कावळे हाच असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी भादवी कलाम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल यांनी केली आहे. मात्र मुख्य सूत्रधार अजून पोलिसांच्या हाती लागला नाही.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Murder, Yavatmal, Yavatmal crime

पुढील बातम्या