मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दुर्देवी! दिवस-रात्र मेहनत करून स्वप्नातील बांधलं घर; गृहप्रवेशानंतर पती-पत्नीने सोडला जीव

दुर्देवी! दिवस-रात्र मेहनत करून स्वप्नातील बांधलं घर; गृहप्रवेशानंतर पती-पत्नीने सोडला जीव

या दाम्पत्याने जीव तोड मेहनत करून स्वत:चं घर उभारलं, मात्र राग आणि गृहकलहामुळे एक दिवसही त्यांना तेथे राहता आलं नाही.

या दाम्पत्याने जीव तोड मेहनत करून स्वत:चं घर उभारलं, मात्र राग आणि गृहकलहामुळे एक दिवसही त्यांना तेथे राहता आलं नाही.

या दाम्पत्याने जीव तोड मेहनत करून स्वत:चं घर उभारलं, मात्र राग आणि गृहकलहामुळे एक दिवसही त्यांना तेथे राहता आलं नाही.

  • Published by:  Meenal Gangurde

लखनऊ, 20 नोव्हेंबर : लखनऊमध्ये (Lucknow News) एका दाम्पत्याने जीव तोड मेहनत करून स्वत:चं घर उभारलं, मात्र राग आणि गृहकलहामुळे एक दिवसही त्यांना तेथे राहता आलं नाही. गोमतीनगर विस्तारमध्ये नव्या घरात प्रवेशानंतर वाद झाला आणि नाराज होऊन साधना मिश्रा (36) हिचा दुर्देवी अंत झाला.

पत्नीला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर पती श्याम किशोर मिश्र (38) यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी दाम्पत्यांचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. एसीपी गोमतीनगर श्वेता श्रीवास्तव यांनी रात्री उशिरा आलेल्या पोस्टमार्टममधून साधना आणि श्याम किशोर यांनी गळफास केल्याची पुष्टी केली आहे.  (The house built in the dream by working hard day and night After entering the house the couple died)

ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करण्यावरुन झाला वाद

गोण्डा निवासी श्याम किशोर मिश्रने गंगोत्री विहारमध्ये नवीन घर बांधलं होतं. त्याच्या कुटुंबात पत्नी साधना, मुलगा अविनाश आणि मुलगी आदिती आहे. श्याम किशोरने भाऊ राम किशोर आणि ब्रज किशोरसह मिळून नवीन घर तयार केलं होतं. मंगळवारी गृहप्रवेश झाला. सकाळी पूजा झाल्यानंतर कुटुंबीय घरात शिफ्ट झाले होते. सायंकाळी नव्या घराबद्दल सर्वांना जेवायला बोलावलं होतं. ज्यात ऑर्केस्ट्रांना बोलावण्यात आलं होतं. श्याम किशोरने सायंकाळच्या कार्यक्रमात दारू घेतली होती. त्यामुळे ऑर्केस्ट्रा पार्टीसह आलेल्या नृत्यांगणासोबत डान्स करीत होता. पत्नी साधनाला पतीचं हे कृत्य आवडलं नव्हतं. त्यामुळे ती वारंवार पतीला घरात घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र श्याम किशोर काहीही ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर कसंबसं साधना पतीला खोलीत घेऊन गेली. मात्र काही वेळानंतर तो परत बाहेर आला. यावरुन दोघांमध्ये खूप वाद झाला. रात्री उशिरा पतीसोबत तिचं पुन्हा भांडण झालं. यावेळी खोलीत मुलगा अविनाश आणि आदितीदेखील होते.

हे ही वाचा-नवरा-बायकोमधील वादाला भयावह रूप; जीव जाईपर्यंत तरुण करीत राहिला वार

नव्या घरासाठी होते उत्साहित...

नव्या घरासाठी दोघेही खूप उत्साहित होते. कोणीही असा विचारदेखील केला नव्हता. दिवसभर घरात पूजा सुरू होती, घरातील सर्वजण आनंदी होते. मात्र हा आनंद काही क्षणात उद्ध्वस्त झालं.

First published:

Tags: Home dec, Husband suicide, Suicide, Wife and husband