मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /50 हजार दिवे, ठाण्यात उभारले शिवरायाचे जगातील सर्वात मोठे मोझॅक पोट्रेट!

50 हजार दिवे, ठाण्यात उभारले शिवरायाचे जगातील सर्वात मोठे मोझॅक पोट्रेट!

ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात 10 तरुणांनी 3 दिवस अथक परीश्रम घेवून हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे पोट्रेट बनवले आहे.

ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात 10 तरुणांनी 3 दिवस अथक परीश्रम घेवून हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे पोट्रेट बनवले आहे.

ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात 10 तरुणांनी 3 दिवस अथक परीश्रम घेवून हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे पोट्रेट बनवले आहे.

ठाणे, 18 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे (chhatrapati shivaji maharaj jayanti 2021) औचित्य साधून ठाण्यात जगातील सर्वात मोठे मोझॅक पोट्रेट (Mosaic portrait) तयार करण्यात आले आहे. पुढील 2 दिवस हे भव्य पोट्रेटचे पाहण्यासाठी खुले करण्यात येणार असून याकरता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

ठाण्यातील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात 10 तरुणांनी 3 दिवस अथक परीश्रम घेवून हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य असे पोट्रेट बनवले आहे. सकल मराठा संस्थे मार्फत हे भव्य पोट्रेट बनवले गेले आहे. या पोट्रेटचे मुख्य मोझॅक कलाकार हे चेतन राऊत असून त्यांनी या पोट्रोट करता 50  हजार दिव्यांचा वापर केला आहे. ज्यात हिरवा, काळा, निळा, लाल, पांढरा आणि पिवळ्या रंगाचे हे दिवे आहेत.

सावध राहा! ‘स्त्री’ पुन्हा येतेय; राजकुमारच्या नव्या Ghost Storyनं माजवली खळबळ

30 फुट बाय 40 फुटांचे हे पोट्रेट असून 20 फुटांवरुन सोशल मीडिया डिस्टंसिंगचे नियम पाळून नागरिकांना हे पोट्रेट पहायला मिळणार आहे. 18, 19 आणि 20 फेब्रुवारी हे पुढील तीन दिवस हे पोट्रेट पाहण्याचा आनंद नागरिक लुटू शकतात. यंदा कोरोना काळ असल्याने कोठेही शिवजयंती निमित्त मिरवणूक काढता येणार नाही. कुठेही जमाव जमवता येणार नाही. त्यामुळे यंदा शिवजयंती साजरी करायची कशी असा प्रश्न अनेकांपुढे होता.

त्याला उत्तर देत ठाण्यात तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 30फुट बाय 40 फुटांचे भव्य असे जगातील सर्वांत मोठे पोट्रेट काढले आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे नियम पाळत हे पोट्रेट पाहण्याचा आनंद लुटावा, असं आवाहन देखील या निमित्ताने आयोजकांनी केलं आहे.

First published:

Tags: Chhatrapati shivaji maharaj, Maharashtra, Mozaic portrait, Mumbai News, Shivaji jayanti, Shivaji maharaj, Thane