मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सावध राहा! ‘स्त्री’ पुन्हा येतेय; राजकुमारच्या नव्या Ghost Storyनं माजवली खळबळ

सावध राहा! ‘स्त्री’ पुन्हा येतेय; राजकुमारच्या नव्या Ghost Storyनं माजवली खळबळ

Roohi

Roohi

2018 मध्ये ज्या 'स्त्री' ला तुम्ही बाय बाय केलं होत तिचं आता पुन्हा एकदा नव्या अवतारात तुमचं मनोरंजन करायला येत आहे.

मुंबई, 18 फेब्रुवारी: ‘ओ स्त्री कल आना’ म्हणत 2018 मध्ये ज्या 'चुडेल'पासून तुम्ही पिच्छा सोडवला होता ती आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस वर एन्ट्री घेणार आहे. एकीकडे बॉलीवूड मधले बिग बजेट चित्रपट अजूनही चित्रपटगृहात आपले चित्रपट प्रदर्शित करायला धजावत आहेत तर दुसरीकडे राजकुमार रावच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर आणि तारीख दोन्हीही जाहीर झाली आहे. राजकुमार राव त्याचा नवा चित्रपट ‘रुही’ घेऊन 11 मार्चला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘इस बार मर्द को ज्यादा दर्द होगा ‘ असं म्हणत राजकुमार रावने त्याच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रीट्वीट केला आहे. सोबतच 11 मार्च ला चित्रपटगृहात भेटू असही म्हटलं आहे.

या चित्रपटात राजकुमार राव सोबतच फुकरे मधला ‘चुचा’ म्हणजेच वरुण शर्मा आणि जान्हवी कपूर सुद्धा आपल्याला मुख्य भूमिकेत पहायला मिळतील. ट्रेलर मध्ये वरुणचा कॉमेडी अंदाज आणि जान्हवीचा घोस्ट लूक आपोआपच चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढवत आहे.

" isDesktop="true" id="523255" >

(हे वाचा-  'जरा बाबांना पण हात धरू दे की!' आराध्याची अतिकाळजी करते म्हणून ऐश्वर्या झाली ट्रोल! पाहा PHOTO)

चित्रपटाची कथा ही रुही पासून सुरु होताना दिसते जेह्वा तिच्या अंगात एक भुत संचारतं. यावेळी हे भुत लग्नाच्या प्रतीक्षेत आहे. तिची नजर नेहमीच कुठल्या ना कुठल्या लग्नघरावर असते. यावेळी चुडेल पासून पिच्छा सोडवण अशक्य वाटत आहे आणि लग्न करूनच तिला मुक्ती मिळेल हा एकच पर्याय समोर दिसत आहे. आता या चुडेल पासून पिच्छा सोडवायला नक्की कोणकोणते उपाय केले जातील आणि त्यात किती धमाल येईल हे येत्या 11 मार्चला चित्रपटगृहातच समजेल.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Janhavi kapoor, Rajkumar rao, Star celebraties, Upcoming movie