नाशिकजवळ भीषण अपघात! मजुरांना घेऊन जाणारा ट्रक आणि कारची धडक, 15 गंभीर

नाशिकजवळ भीषण अपघात! मजुरांना घेऊन जाणारा ट्रक आणि कारची धडक, 15 गंभीर

परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारे 3 ट्रक आणि 1 कारचा भीषण विचित्र अपघात झाला

  • Share this:

चांदवड, 11 मे: परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारे 3 ट्रक आणि 1 कारचा भीषण विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात कार मधील तिघांचा समावेश आहे. जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आलं असून त्यांना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

मजुरांचा ट्रक आणि समोरून येणारी कारची जोरदार धडक झाली. चांदवडच्या राहुड घाटात हा अपघात झाला आहे. मागून येणारे 2 ट्रक पुढील ट्रकवर येऊन आदळले.

हेही वाचा.. भीषण अपघात: डॉक्टर पत्नीसह पतीचा मृत्यू, मुलाला आणण्यासाठी निघालं होतं दाम्पत्य

मिळालेली माहिती अशी की, चांदवडच्या राहुड घाटात परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारे 3 ट्रक आणि एक कारचा विचित्र अपघात झाला. त्यात 12 ते 15 मजूर तर कारमधील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

लॉकडाऊनमुळे सध्या परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने स्थलांतरीत होत आहे. मिळेल त्या वाहनातून ते आपल्या गावाकडे जात आहे. काही मजुरांनी तर पायी चालत जाण पसंत केलं आहे.

हेही वाचा.. ल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद, पाहा चिंता वाढवणारी आकडेवारी

असेच काही मजूर हे 3 ट्रकमधून उत्तर प्रदेशकडे जात असताना चांदवडच्या राहुड घाटात समोरून येणारी कार आणि एका ट्रकची जोरदार धडक झाली. मागून येणारे 2 ट्रक पुढील ट्रकवर येऊन आदळले. अपघातग्रस्त वाहनातून जखमींना काढून त्यांना रुग्णलायत दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या महामारीमुळे सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. या लॉकडाऊनमुळे शहरं ओस पडली असून गावगाडाही ठप्प झाला आहे. हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात सार्वजनिक वाहतूनक ठप्प आहे. त्यामुळे परप्रांतीय मजुर आपल्या मुलाबाळांना घेऊन आपल्या गावाकडे निघाले आहेत. जीवाची पर्वा न करता मजूर मिळेल त्या वाहनाने गावी निघाले आहे. तर काही मजुरांनी पायी प्रवास सुरु केला आहे.

First Published: May 11, 2020 10:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading