भीषण अपघातात डॉक्टर पत्नीसह पती जागीच ठार, मुलाला आणण्यासाठी निघालं होतं दाम्पत्य

भीषण अपघातात डॉक्टर पत्नीसह पती जागीच ठार, मुलाला आणण्यासाठी निघालं होतं दाम्पत्य

लॉकडाऊनमुळे कोल्हापूर जिल्ह्यात अडकून पडलेल्या मुलाला आणण्यासाठी हे दाम्पत्य निघालं होतं. पण वाटेच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

  • Share this:

सातारा, 9 मे: पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यातील भोसलेवाडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील डॉक्टर पत्नीसह पतीचा जागीच मृत्यू झाला. डॉ.अनुजा अमित गावडे (वय-35) व अमित गावडे (वय-38) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.  पुण्यातील हडपसर भागातील ग्रीन फिल्ड सोसायटीत हे दाम्पत्य रहात होतं. अमित गावडे हे इंजिनिअर होते. लॉकडाऊनमुळे कोल्हापूर जिल्ह्यात अडकून पडलेल्या मुलाला आणण्यासाठी हे दाम्पत्य निघालं होतं. पण वाटेच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

हेही वाचा.. गोवा हादरलं! 3 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार, पीडितेनं असा कथन केला प्रसंग

मिळालेली माहिती अशी की, पुणे-कोल्हापूर महामार्गावर साताऱ्याच्या हद्दीत शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. कोल्हापूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि कार डिव्हायडरला धडकली. यात डॉ.अनुजा गावडे यांच्यासह त्यांच्या पतीचा जागेवरच मृत्यू झाला.

अखेर मुलाची भेट नाही...

या दाम्पत्याचा 5 वर्षांचा मुलगा आमिष हा नित्तूर (ता. चंदगड, जि.कोल्हापूर) येथे आजी- आजोबांकडे लॉकडाऊनमुळे अडकला होता. तो वारंवार रडत होता. त्यामुळे त्याला आणण्यासाठी हे दाम्पत्य चंदगडला जात होतं. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. आणि त्यात आमिषच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. अखेर दुर्दैवाने आमिष आणि त्याच्या आई-वडिलांची भेट झाली नाही, असच म्हणालं लागेल.

हेही वाचा.. गड आला पण सिंह गेला! चकमकीत उपनिरीक्षक शहीद, 4 माओवाद्यांना कंठस्नान

सध्या लॉकडाऊनमुळे महामार्गावर वाहनांच प्रमाण कमी आहे. त्यामुळे भरधाव असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटून भोसलेवाडी गावाजवळ कार डिव्हायडरला धडकली आणि सातारा जाणाऱ्या लेनवर जाऊन पलटी झाली. कारमधीव अतित गावडे आणि त्यांची पत्नी डॉ.अनुजा गावडे यांचा जागेवरच मृत्यू झाला, अशी माहिती उंब्रज पोलिसांनी दिली आहे. माहामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अपघाताची नोंद उंब्रज पोलिसांत करण्यात आली आहे.

First published: May 9, 2020, 1:48 PM IST

ताज्या बातम्या