Home /News /maharashtra /

ठेकेदारानं दिला निम्माच पगार, संतप्त कामगारांकडून तोडफोड तर पोलिसांवरही हल्ला

ठेकेदारानं दिला निम्माच पगार, संतप्त कामगारांकडून तोडफोड तर पोलिसांवरही हल्ला

या दगडफेकीत तीन पोलिस जखमी झाले असून सात वाहनांची तोडफोड झाली आहे. हल्लेखोर कामगार परप्रांतीय असल्याची माहिती मिळाली आहे.

पंढरपूर, 17 एप्रिल: देशात लॉकडाऊन त्यात ठेकेदारानं निम्माच पगार दिल्याने संतापलेल्या कामगारांनी कार्यालयाची तोडफोड केली. एवढंच नाही तर पोलिस आल्याचे पाहून त्यांच्यावरही संतप्त जमावानं दगडफेक केल्याची घटना सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील दिलीप बिल्डकॉन कॅम्पसमोर घडली. या दगडफेकीत तीन पोलिस जखमी झाले असून सात वाहनांची तोडफोड झाली आहे. हल्लेखोर कामगार परप्रांतीय असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 9 कामगारांविरुद्ध शासकीय कामात अडथळा कलम 353 व कलम 332 188 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा.. मुंबईकरांना मोठा दिलासा! या 'रेड झोन' परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोलापूर-सांगली राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर परप्रांतीय मजूर कामगार मोठ्या संख्येने काम करतात. मध्यप्रदेश येथील काही कामगार दिलीप बिल्डकॉन कंपनीत रोजंदारीवर काम करतात. ठेकेदारानं मजुरांना निम्मा पगार दिल्यावरून कंपनीच्या कार्यालयासमोर वाद झाला. कंपनीच्या व्यवस्थापक त्रिपाठी यांच्याशीही कामगारांनी हुज्जत घातली. कामगार जास्तच गदारोळ करत असल्याचं लक्षात येताच कंपनी प्रशासनाने पोलिसांना पाचरण केलं. पोलिसांना आल्याचं पाहून कामगार अधिक संतप्त झाले. त्यांनी कंपनीच्या कार्यालयावर व कंपनीच्या लोकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. एवढेच नाही तर जमावानं कंपनीच्या परिसरात उभ्या असलेल्या चार चाकी आणि दुचाकींचीही तोडफोड केली. या दगडफेकीत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीस नाईक विजय केशव थिटे यांनी फिर्याद दाखल केली असून तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलवडे करीत आहेत. हेही वाचा..शेवटी आईच ती... आजारी मुलाच्या काळजीमुळे आईने 6 राज्यातून केला 2700 किमी प्रवास सोनेलाल एमवीर सिंह उर्फ सोनू गुलाब प्रसाद रामलाल कोरी, राजेश कुमार शिवलोहार पटेल, राधिका बलीप्रसाद पटेल , रमेशकुमार राम खेलावन पटेल, मनिष रामलाल मौर्या सर्वजण (रा.कोरली, ता. सिंहाबल, जि. सिंधी), राजेश कुमार दशरथ पटेल , महंमद अशपाक सिध्दी (रा. श्रीपालपूर ता.जि.बिस्ती) अशी आरोपींची नावं आहेत. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Sangola, Solapur news

पुढील बातम्या