तिरुवनंतपुरम, 17 एप्रिल : कोरोनामुळे सध्या देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे लोकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीतही केरळमधील एक 50 वर्षीय महिला रुग्णालयात असलेल्या मुलाला भेटण्यासाठी राजस्थानमधील जोधपूरमध्ये पोहोचली. यासाठी तिनं कारमधून 6 राज्यातून 2 हजार 700 किमी प्रवास केला. यावेळी महिलेसोबत तिची सून आणि एक नातेवाईक होता. या सर्वांनी तीन दिवस प्रवास करत राजस्थान गाठलं. केरळच्या सील्लमा वसन यांनी म्हटलं की, ‘मुलगा अरुण कुमार बीएसएफमध्ये आहे. सध्या जोधपूरमध्ये असलेल्या अरुणला मायोसिटिसचा त्रास आहे. यामुळे मांसपेशींना सूज येते. त्याच्यावर उपचार सुरू असून आता थोडं बरं वाटत आहे.’ दरम्यान, डॉक्टरांनी जेव्हा अरुणच्या तब्येतीची माहिती दिली तेव्हा केरळमधून जोधपूरला जाण्याचा निर्णय़ 50 वर्षांच्या सील्लमा यांनी घेतला. त्यानंतर केरळमधून तामिळनाडु, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात ते राजस्थान असा प्रवास त्यांनी केला. लॉकडाऊनच्या काळात प्रवासावर अनेक निर्बंध आहेत. मात्र तरीही या अडचणीच्या काळात सील्लमा जोधपूरमध्ये पोहोचल्या. यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री व्ही मुरलीधरन, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह इतर लोकांचे आभार मानले. तसंच ज्यांनी यासाठी पास उपलब्ध करून दिले त्यांनाही सील्लमा यांनी धन्यवाद दिले. हे वाचा : आमदाराच्या समर्थकांवर कारवाई करणाऱ्या महिला IAS ची बदली याआधी भारतीय सैन्यात कर्नल असलेल्या मुलाच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी 2 हजार किमी प्रवास केला होता. मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी ते गाडीने प्रवास करून पोहोचले होते. लॉकडाऊनमुळे मुलाचा मृतदेह मुळगावी आणण्याची सोय नसल्यानं आई वडिलांना गाडीने बेंगळुरूत पोहोचावं लागलं होतं. हे वाचा : कोरोनासाठी स्पीड ब्रेकर ठरलं लॉकडाऊन, वाचा आधी आणि नंतर काय झालं?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.