Home /News /mumbai /

मुंबईकरांना मोठा दिलासा! या 'रेड झोन' परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट

मुंबईकरांना मोठा दिलासा! या 'रेड झोन' परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. त्यात शुक्रवारी आणखी 77 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

    मुंबई,17 एप्रिल: मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. त्यात शुक्रवारी आणखी 77 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर पाच जण दगावले आहेत. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2120 झाली आहे. त्याचबरोबर 201 संशयित रुग्ण विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मुंबईत कोरोनानं थैमान घातलं असताना एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे मुंबईतील रेड झोन परिसरात रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मुंबईच्या वरळी विभागात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून आली आहे. सलग चार दिवस रुग्ण संख्येत घट होत आहे. वरळीत कोरोनाबाधितांची संख्या 389 इतकी जास्त झाली आहे. मात्र, गेले चार दिवस रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. 14 एप्रिल रोजी या भागात 52 रुग्ण आढळले होते. त्यानंतर 15 एप्रिलला 27, 16 एप्रिलला 11 आणि 17 एप्रिल म्हणजे आज 9 रुग्ण आढळले आहे. याचा अर्थ असा की, या परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हळू हळू कमी होताना दिसत आहे. हेही वाचा...गलथान कारभार समोर, 15 तासांपेक्षा जास्त काळ लोटला तरी पॉझिटिव्ह रुग्ण घरीच कोरोना रुग्णांचं प्रमाण 40 टक्क्यांनी घटलं... दुसरीकडे, देशात कोरोना वाढण्याचं प्रमाण 40 टक्क्यांनी घटलं असल्याची माहिती मिळाली आहे. देशभरात आतापर्यंत 13.6 टक्के रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला असून त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 80 टक्के कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरं होण्याचा मार्गावर असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. हेही वाचा..अश्रूंमार्फतही Coronavirus पसरतो का? काय सांगतात तज्ज्ञ? दरम्यान, गेल्या 24 तासांत कोरोनानं 23 जणांचा बळी घेतला आहे. तर 1,007 नवे रुग्ण आढळले आहेत. देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 13,387 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 437 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यू ही चिंतेचा बाब असल्याचं लव अग्रवाल यांनी सांगितलं आहे. त्यामुळे वेगाने आम्ही प्रयत्न करत आहोत. देशभरात अँटी बॉडीजवर काम केलं जात आहे. प्लाझ्माच्या माध्यमातून उपचार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, आपल्याला कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचा पराभव करायचा आहे, अशीही माहिती अग्रवाल यांनी दिली. संपादन- संदीप पारोळेकर
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या