श्रद्धा कपूर ही बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
अलिकडेच ती आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबीयांसोबत मालदीव येथे गेली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
सध्या ती मालदीवमध्ये कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान तिथं झालेल्या एका सेलिब्रिटी पार्टीत देखील तिनं हजेरी लावली होती. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
या पार्टीत ती आपला कथित प्रियकर रोहन श्रेष्ठ सोबत आली होती. या पार्टीचे व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
या पार्टीत तिनं परिधान केलेल्या ड्रेसनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. चाहते नेहमीच सेलिब्रिटींच्या वस्तुंबाबत जाणून घेण्यास उत्सुक असतात. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
या पार्श्वभूमीवर अनेक चाहत्यांनी श्रद्धानं परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अन् ती किंमत पाहून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्काच बसेल. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
या ड्रेसची किंमत 5 हजार 899 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास 4 लाख 31 हजार रुपये इतकी आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
“इतक्या पैशांमध्ये ड्रेसच काय कपड्यांचं अख्ख दुकान सामान्य माणूस खरेदी करु शकतो.” अशा आशयाच्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
काही जणांच्या मते हा ड्रेस श्रद्धाला तिच्या कथित प्रियकरानं गिफ्ट केला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
श्रद्धा गेल्या काही महिने रोहन श्रेष्ठाला डेट करत असल्याची चर्चा आहे. रोहन हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध फोटोग्राफर आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)