मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोदींना कोलकातासाठी वेळ आहे, शेतकऱ्यांसाठी नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

मोदींना कोलकातासाठी वेळ आहे, शेतकऱ्यांसाठी नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची कोलकातामध्ये महासभा पार पडली.मोदींच्या या सभेवर आता विरोधकांची टीका होऊ लागली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची कोलकातामध्ये महासभा पार पडली.मोदींच्या या सभेवर आता विरोधकांची टीका होऊ लागली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची कोलकातामध्ये महासभा पार पडली.मोदींच्या या सभेवर आता विरोधकांची टीका होऊ लागली आहे.

  • Published by:  News18 Desk

रांची, 7 फेब्रुवारी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची कोलकातामध्ये महासभा पार पडली. या महासभेच्या माध्यमातून भाजपनं बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Elections 2021)  प्रचाराला सुरुवात केली आहे. मोदींच्या या सभेवर आता विरोधकांची टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदींवर टीका केली आहे. ते रांचीमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत बोलत होते.

''भाजपाच्या हातामध्ये सत्ता गेल्यापासून देशात धर्मांध विष वाढत आहे. शेतकरी आंदोलन करत आहेत. पंतप्रधानांकडे परदेशात जाण्यासाठी वेळ आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात कोलकातामध्ये सभा घेण्यासाठी वेळ आहे, पण 20 किलो मीटर दूर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही.'', अशी टीका पवारांनी केली आहे.

कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या  सुरु असलेल्या आंदोलनाला शनिवारी 100 दिवस झाले. या आंदोलकांची पंतप्रधान मोदी यांनी अजून एकदाही भेट घेतलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका होत आहे.

Centre's responsibility is to establish brotherhood, but BJP spreading communal poison in country. Farmers have been protesting for 100 days, PM has time to go to Kolkata, rally against West Bengal govt, but no time to visit farmers in Delhi: Sharad Pawar at a program in Ranchi pic.twitter.com/jumJ86g6sh

— ANI (@ANI) March 7, 2021

( वाचा : 'पाच वर्ष बंगालला उद्ध्वस्त केलं', मोदींचा ममतादीदींवर जोरदार हल्लाबोल )

युरोपात कोव्हिडची समस्या वाढत आहे. भारतामध्ये देखील ती गंभीर होत आहे. या परिस्थितीमध्ये सरकारची जबाबदारी आहे. त्या परिस्थितीमध्ये सरकार काय करत आहे? मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना सांगितले की थाळी वाजवा आणि लोकांना जागृत करा. आम्ही थाळी वाजवणाऱ्यांमधील नाही. आम्हाला थाळीमध्ये अन्न कसं येईल याची चिंता आहे. महाराष्ट्राच्या विकासात झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या लोकांच्या मेहनतीचं योगदान असल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितले.

First published:

Tags: Assembly Election 2021, Farmer protest, Narendra modi