पुणे-नगर-पुणे प्रवास भोवला! शासनादेश डावलणाऱ्या अधिकारी महिलेला हायवेवर घेतलं ताब्यात

पुणे-नगर-पुणे प्रवास भोवला! शासनादेश डावलणाऱ्या अधिकारी महिलेला हायवेवर घेतलं ताब्यात

अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता गवांदे यांनी पुणे-अहमदनगर-पुणे प्रवास करणे चांगलेच भोवलं आहे.

  • Share this:

अहमदनगर, 18 जून: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा बंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता गवांदे यांनी दररोज पुणे-अहमदनगर-पुणे प्रवास करणे चांगलेच भोवलं आहे.शासनाची कुठलीही परवानगी न घेता कविता गवांदे या दररोज ये-जा करत होत्या. ही धक्कादायक बाब लक्षात आल्यानंतर श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने कविता गवांदे यांना पुणे-नगर प्रवास करताना ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा..पुण्यात कोरोनाचा कहर! नवे हॉटस्पॉट आले समोर, आठवडाभरात आढळले 360 च्यावर रुग्ण

जिल्हा बंदीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसूल प्रशासनाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अहमदनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी महसूल प्रशासनाच्या ताब्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी  कविता गवांदे यांना श्रीगोंद्याचे तहसिलदार महेंद्र माळी यांनी ही कारवाई केली आहे त्या पुण्यावरून नगरला प्रवास करत असताना कुठलीही परवानगी न घेता त्या दररोज पुणे अहमदनगर प्रवास करत होत्या,  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष आदेश दिले आहेत. त्यात जिल्हा बंदीचाही आदेश आहे. मात्र, त्यांच्या या आदेशाला प्रशासनातीलच अधिकारी हरताळ फासत आहेत.

नगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना महसुलाच्या पथकाने गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले. त्यांच्यावर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली.  कविता गावंडे या नगरवरून रोज पुण्याचा प्रवास करतात. मात्र त्यासाठी त्यांनी अधिकृत कुठलाही परवाना घेतलेला नाही. तरीही त्या प्रवास करतात.

हेही वाचा... 21 महिने झाले तरी लेकावर केले नाही अंत्यसंस्कार, घरातच जपून ठेवला सांगाडा

गुरुवारी सकाळी त्यांना अशाच प्रवासादरम्यान पुणे-नगर महामार्गावर गव्हाणेवाडी येथे त्यांचे वाहन श्रीगोंद्याच्या निवासी नायब तहसीलदार चारुशीला पवार आणि  योगीता ढोले यांच्या पथकाने थांबविले. परवान्याची चौकशी केली. मात्र, त्यांच्याकडे परवाना नसल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

First published: June 18, 2020, 1:23 PM IST

ताज्या बातम्या