• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • सांगलीतील महिलेनं Amazon कंपनीला घातला 28 लाखांचा गंडा; 5 महिन्यांपासून करत होती फसवणूक

सांगलीतील महिलेनं Amazon कंपनीला घातला 28 लाखांचा गंडा; 5 महिन्यांपासून करत होती फसवणूक

Crime in Sangli: सांगलीतील एका महिलेनं ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रातील अ‍ॅमेझॉन कंपनीला (amazon online shopping company) तब्बल 28 लाख रुपयांना गंडा (28 lakh fraud) घातला आहे.

 • Share this:
  सांगली, 22 ऑक्टोबर: सांगलीतील एका महिला कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रातील अ‍ॅमेझॉन कंपनीला (amazon online shopping company) तब्बल 28 लाख रुपयांना गंडा (28 lakh fraud) घातल्याची घटना समोर आली आहे. संशयित आरोपी महिलेनं आपल्या अधिकाराचा गैरवापर करत, ही फसवणूक केली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर, संबंधित प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित महिलेविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. भाग्यश्री नागनाथ पावले असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचं नाव असून त्या सांगलीतील शंभरफुटी रोड परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली शहरातील बालाजीनगर परिसरात अ‍ॅमेझॉन कंपनीचं एनटेक्स ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाचं कार्यालय आहे. संशयित आरोपी महिला याच कंपनीत काम करते. ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी केल्यानंतर, याच कार्यालयातून ग्राहकांना पार्सल घरपोहोच पाठवलं जात. हेही वाचा-गॅस भरण्यासाठी माहेरून पैसे न आणल्याने पत्नीची हत्या; विळ्याने केले सपासप वार हे पार्सल घेऊन जाणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे अथवा ग्राहकांकडे सुट्टे पैसे नसतील तर, संबंधित ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवण्यासाठी अ‍ॅमेझॉन कंपनीची एक सुविधा आहे. या सुविधेचं नाव 'रॅबिट' असून या अ‍ॅपमधून ग्राहकांची उर्वरित रक्कम त्यांना ऑनलाइन ट्रान्सफर केली जाते. संशयित महिला या कार्यालयात अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना पैसे पाठवण्याचे काम करत होती. दरम्यान तिने नोव्हेंबर 2020 ते एप्रिल 2021 या कालावधीत 111 ग्राहकांना त्यांची रक्कम परत पाठवली नाही. हेही वाचा-दिल्लीतील डॉक्टरला 2 कोटींचा चुना लावणाऱ्या तरुणाची आत्महत्या, यवतमाळमधील घटना कोणतंही कारण नसताना, आरोपी महिलेनं 28 लाख 10 हजार 300 रुपयांची रक्कम 'अ‍ॅमेझॉन पे'वर जमा करून ठेवली होती. संबंधित गैरप्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर, अधिकारऱ्यांनी संशयित महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संजयनगर पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: