• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • दिल्लीतील डॉक्टरला 2 कोटींचा चुना लावणाऱ्या तरुणाची आत्महत्या, यवतमाळमधील घटना

दिल्लीतील डॉक्टरला 2 कोटींचा चुना लावणाऱ्या तरुणाची आत्महत्या, यवतमाळमधील घटना

Suicide in Yavatmal: दिल्लीतील एका बड्या डॉक्टरला 2 कोटींचा चुना लावणाऱ्या (2 crore fraud ) यवतमाळमधील तरुणाने आत्महत्या केली आहे.

 • Share this:
  यवतमाळ, 22 ऑक्टोबर: यवतमाळ येथील एका तरुणाने काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका बड्या डॉक्टरची तब्बल 2 कोटींची फसवणूक (2 Crore fraud) केली होती. आरोपीनं फेसबुकवर अनन्या सिंग ओबेरॉय नावाने बनावट अकाऊंट (Fake facebook account) काढून दिल्लीतील डॉक्टरला गंडा घातला होता. संबंधित तरुणाचा कांड उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत त्याची तुरुंगात रवानगी केली होती. काही दिवसांपूर्वी जामिनावर त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संबंधित तरुणाने आत्महत्या केली (fraudster commits suicide) आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतं आहेत. संदेश मानकर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव असून तो यवतमाळ शहरातील अरणोदय सोसायटीतील रहिवासी आहे. मृत संदेशचं बारावी पर्यंत शिक्षण झालं आहे. त्याने वर्षभरापूर्वी अनन्या सिंग ओबेरॉय नावाने बनावट फेसबुक अकाऊंट काढलं होतं. यातून त्याची मैत्री दिल्लीतील उच्चशिक्षित डॉ. गोयल याच्याशी मैत्री झाली होती. आरोपी संदेश हा अनन्या बनून दिल्लीतील डॉक्टरशी संवाद साधत होता. हेही वाचा-प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला दिला रोज थोडा-थोडा मृत्यू;पत्नीचा कांड वाचून हादराल दरम्यान आरोपीनं स्वत:च्या बहिणीचं अपहरण झाल्याची बतावणी केली. बहिणीला वाचवण्यासाठी दोन कोटींची आवश्यकता असल्याचं त्याने डॉक्टर गोयल यांना सांगितलं. काळजीपोटी डॉक्टर गोयल दोन कोटी रुपयांची रक्कम घेऊन यवतमाळला आले होते. यानंतर आरोपी संदेशने गोयल यांच्याकडून 2 कोटी रुपये घेऊन त्यांच्याशी संपर्क तोडला होता. हेही वाचा-गॅस भरण्यासाठी माहेरून पैसे न आणल्याने पत्नीची हत्या; विळ्याने केले सपासप वार आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, डॉक्टर गोयल यांनी अनन्या सिंग ओबेरॉय (बनावट अकाऊंट) हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तांत्रिक तापस केला असता, संबंधित अकाऊंट यवतमाळ येथील तरुण संदेश मानकर याचं असल्याचं लक्षात आलं. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली होती. पण जामिनावर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर, संदेशने आत्महत्या केली आहे. संदेशच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न उपस्थित होतं आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: