जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हृदयद्रावक! शेवटी पाणीही मिळालं नाही; विहिरीजवळ जाताच बीडमधील मायलेकासोबत घडलं भयानक

हृदयद्रावक! शेवटी पाणीही मिळालं नाही; विहिरीजवळ जाताच बीडमधील मायलेकासोबत घडलं भयानक

विहिरीत पडून मायलेकाचा मृत्यू

विहिरीत पडून मायलेकाचा मृत्यू

आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील शेंडे वस्तीवर राहत असलेल्या वर्षा शेंडे या पिण्याचं पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या होत्या. यावेळी ही घटना घडली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बीड 03 ऑक्टोबर : बीडमधून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ज्यात विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेत घराच्या अगदी जवळच असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या मायलेकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुण्याहून चार मित्र फिरायला रत्नागिरीला गेले, मात्र, गावखडी समुद्रात घडला धक्कादायक प्रकार ही दुर्दैवी घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील डोंगरगण गावात घडली आहे. वर्षा भगवान शेंडे (वय 22) आणि आर्यन भगवान शेंडे (वय 2 अशी) अशी मृत मायलेकांची नावं आहेत. आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील शेंडे वस्तीवर राहत असलेल्या वर्षा शेंडे या पिण्याचं पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या होत्या. यावेळी ही घटना घडली. वर्षा शेंडे यांच्यासोबत त्यांचा 2 वर्षाचा मुलगा आर्यन शेंडे हादेखील गेला होता. मात्र, विहीरीतून पाणी बाहेर काढताना त्यांचा तोल गेला आणि माय-लेक विहिरीत पडले. या घटनेत महिला आणि तिच्या चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मुत्यू झाला आहे. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मात नोंद करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली आहे. सर्व विसरून बेधुंद होऊन नाचला, गरब्याच्या आनंदात ठाण्यातील 25 वर्षीय तरुणाचा गेला जीव; कुटुंबावर शोककळा मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती भगवान शेंडे कामाला गेल्याने उशिरा घरी आला. पत्नी आणि मुलगा घरी नसल्याने इकडे तिकडे शोध घेतला गेला. यावेळी ते दोघेही विहीरीत पडल्याचं दिसून आलं. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, अंमलदार दत्ता टकले, प्रशांत कांबळे, शिवदास केदार, संतोष राठोड यांनी पंचनामा केला. कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दोघांचंही शवविच्छेदन करण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात