मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्याहून चार मित्र फिरायला रत्नागिरीला गेले, मात्र, गावखडी समुद्रात घडला धक्कादायक प्रकार

पुण्याहून चार मित्र फिरायला रत्नागिरीला गेले, मात्र, गावखडी समुद्रात घडला धक्कादायक प्रकार

आकाश सुतार हा तरुण समुद्रात पोहण्यासाठी गेला होता.

आकाश सुतार हा तरुण समुद्रात पोहण्यासाठी गेला होता.

आकाश सुतार हा तरुण समुद्रात पोहण्यासाठी गेला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ratnagiri, India
  • Published by:  News18 Desk

रत्नागिरी, 3 ऑक्टोबर : रत्नागिरीहून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गावखडी समुद्रात एक तरुण बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. आकाश पांडुरंग सुतार (28) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

पुण्याहून पावस परिसरात फिरण्यासाठी आलेल्या चार मित्रांपैकी एकजण रविवारी साडेअकरा वाजेच्या दरम्यान गावखडी समुद्रात बुडाला आहे. आकाश पांडुरंग सुतार (28) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे येथून प्रशांत जालिंदर काळे, आकाश सुतार, राजकुमार शेषराव पिटले, ज्ञानोबा येडीलवाड हे चौघे मित्र सुट्टी असल्याने फिरण्यासाठी रत्नागिरीत पावसला आले होते.

रविवारी सकाळी पावसपासून जवळच असलेल्या गावखडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. समुद्रकिनाऱ्यावर फिरताना आकाश सुतार हा तरुण समुद्रात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेले तिघेजण पोहता येत नसल्याने समुद्रकिनारी बसून राहिले होते. पाण्याचा जोर वाढल्याने आकाश गटांगळ्या खाऊन बुडत असल्याचे मित्रांच्या लक्षात आले.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, लोणावळ्यातून एकाला बेड्या, पोलिसांची मोठी कारवाई

यावेळी राजकुमार पिटले याने समुद्राच्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, आकाश दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने जवळच असलेल्या एका दुकानदाराला माहिती देऊन पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यांशी संपर्क केला. त्यानंतर तातडीने पोलीस व ग्रामस्थ यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, रात्री उशिरापर्यंत आकाशचा शोध लागला नव्हता.

First published:

Tags: Ratnagiri