मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सर्व विसरून बेधुंद होऊन नाचला, गरब्याच्या आनंदात ठाण्यातील 25 वर्षीय तरुणाचा गेला जीव; कुटुंबावर शोककळा

सर्व विसरून बेधुंद होऊन नाचला, गरब्याच्या आनंदात ठाण्यातील 25 वर्षीय तरुणाचा गेला जीव; कुटुंबावर शोककळा

आज दोन तरुणांचा गरबा खेळताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.

आज दोन तरुणांचा गरबा खेळताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.

आज दोन तरुणांचा गरबा खेळताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

अमित राय/ डोंबिवली, 2 ऑक्टोबर : मुलुंडमध्ये एका नवरात्र उत्सवात गरबा खेळत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऋषभ लहरी मंगे असं या तरुणाचं नाव असून तो डोंबिवली पश्चिम येथे राहणारा होता. ऋषभ हा बोरिवली येथे एका खाजगी कंपनीत काम करत होता.

गरबा खेळत असताना छातीत दुखू लागल्याने त्याला आदिती हॉस्पिटल पिके रोड मुलुंड पश्चिम या ठिकाणी दाखल केले असता डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी त्याला मृत घोषित केले.

Video : 50 जणांमध्ये कॅमेऱ्याची नजर त्याच्यावरच, गरबा खेळता खेळता कोसळला अन् मृत्यू

ऋषभ आपल्या आई-वडिलांसोबत डोंबिवलीत राहत होता. त्याच्या घरातील तो एकमेव कमावती व्यक्ती होता. आई-वडिलांचे आधार होता. ऐन 25 व्या वयातच त्याच्यावरच काळाने घाला घातल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तारापूरमध्येही गरबा खेळताना एकाचा मृत्यू

ही घटना तारापूर येथील आहे. विविध सोसायट्यांमध्ये छोटे खानी स्वरुपात गरब्यात आयोजन केलं जातं. नागरिकही त्यात हिरिरीने सहभागी होतात. मात्र तारापूर येथे गरबा खेळत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तारापुरमधील आदी शिवशक्ती सोसायटीमध्ये गरब्याच आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान गरबा खेळता खेळता एक तरुण खाली कोसळला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Death, Navratri, Thane