मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /डिग्री न घेता अनुभवातून मी सुद्धा 50% डॉक्टर झालोय, कोविड सेंटरमधला अनुभव सांगताना आमदार निलेश लंके यांचं वक्तव्य

डिग्री न घेता अनुभवातून मी सुद्धा 50% डॉक्टर झालोय, कोविड सेंटरमधला अनुभव सांगताना आमदार निलेश लंके यांचं वक्तव्य

कोरोना मधून बरे होताना रुगणाच्या डोक्यात आत्महत्या करण्याचे विचार यायचे. त्यावेळी मानसिक आधार दिला, असा अनुभव निलेश लंके यांनी बीडमध्ये सांगितला आहे.

कोरोना मधून बरे होताना रुगणाच्या डोक्यात आत्महत्या करण्याचे विचार यायचे. त्यावेळी मानसिक आधार दिला, असा अनुभव निलेश लंके यांनी बीडमध्ये सांगितला आहे.

कोरोना मधून बरे होताना रुगणाच्या डोक्यात आत्महत्या करण्याचे विचार यायचे. त्यावेळी मानसिक आधार दिला, असा अनुभव निलेश लंके यांनी बीडमध्ये सांगितला आहे.

बीड, 06 ऑगस्ट: डिग्री न घेता अनुभवातून मी सुद्धा 50 टक्के डॉक्टर (Doctor) झालो असल्याचं वक्तव्य आमदार (MLA) निलेश लंके (Nilesh lanke) यांनी केलं आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील शिरूर कासार येथे आयोजित कोविड योद्धांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते.

कोरोनामध्ये 80 टक्के मृत्यू हे भीती पोटी झाले आहेत. लोकांची भीती घालवण्याचं काम केलं,औषधापेक्षा रुग्णांची मानसिकता बदलवून 25 हजार रुग्ण कोरोनामुक्त केले. त्यामुळे डिग्री न घेता अनुभवातून मी सुद्धा 50% डॉक्टर झालो, असं आमदार निलेश लंके यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले की, कोरोनाच्या काळात ज्यांनी काम केलं त्यांच्या बाबतीत सरकार  पॉझिटिव्ह विचार करत आहे. तिसऱ्या लाटेमध्ये देखील भीती न बाळगता काळजी घेतली पाहिजे. कोरोना काळात 80 टक्के रुग्णांचे मृत्यू केवळ भीतीपोटी झाले आहेत.औषधापेक्षा लोकांच्या मनातील भीती घालविणे हे प्रभावी औषध असल्याचे ओळखून रुग्णांमध्ये मिसळून त्यांची सेवा केली आणि त्यांच्या डोक्यातील कोविड काढण्याचे काम केले.

पुण्यात फायनान्स कंपनीकडून रिक्षा चालकाला बेदम मारहाण

ज्या काळात रक्ताच्या नात्याचे लोक जवळ येत नव्हते. त्या वेळी लोकांना आधार देण्याचे काम कोविड सेंटरच्या माध्यमातून केले. 700 शुगर वय 68, ऑक्सिजन लेव्हल 60 असे रुग्ण ठणठणीत होऊन घरी गेले. ऑक्सिजन लेव्हल 40 झाली तेव्हा एका रुग्णाच्या पत्नी आणि मुलाला बोलवलं. तर दोघांनी जवळ जायला नकार दिला. त्या रुग्णाला मानसिक आधाराची गरज असताना रक्ताची नाती जवळची निघून गेली. मात्र आम्ही त्या व्यक्तीला धीर देऊन जगवलं. काही रुग्ण मानसिक आधार नसल्याने आत्महत्येचा विचार देखील करायचे त्यांना देखील धीर देऊन सावरलं असं निलेश लंकेंनी सांगितलं.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत काळजी घ्यावी भीती बाळगू नये तसेच रुग्णाला मानसिक आधार द्या असे देखील निलेश लंके यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे आयोजित कोव्हिड योद्ध्यांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते. या वेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री,पदमश्री शब्बीर सय्यद, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, यांची उपस्थित होते.

First published:
top videos

    Tags: Mla, NCP, Nilesh lanke