• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • पुण्यात बजाज फायनान्स कंपनीकडून रिक्षा चालकाला बेदम मारहाण

पुण्यात बजाज फायनान्स कंपनीकडून रिक्षा चालकाला बेदम मारहाण

पुण्यातल्या खराडी परिसरात ही घटना घडली आहे. भररस्त्यावर बजाज फायनान्सचे गुंड सध्या मोठ्या प्रमाणात दहशत माजवत आहेत.

  • Share this:
पुणे, 06 ऑगस्ट: पुण्यात (Pune) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. फायनान्स (Finance Company) कंपनीकडून रिक्षा चालकाला (Rickshaw Driver) बेदम मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यातल्या खराडी परिसरात ही घटना घडली आहे. बजाज फायनान्सच्या (Bajaj Finance Company) गुंडांनी रिक्षाचालकला भर रस्त्यात मारल्याची घटना घडली आहे. भररस्त्यावर बजाज फायनान्सचे गुंड सध्या मोठ्या प्रमाणात दहशत माजवत आहेत. लॉकडाऊन आणि कोरोना निर्बंधांमुळे दोन वेळच्या अन्नाची सोय करण्यास असमर्थ असणाऱ्या गोर गरीब रिक्षाचालकांना भर-रस्त्यात अडवून बेकायदेशीरपणे वसुली करत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. हेही वाचा- लोकल सुरु करण्यासाठी रेल्वे स्टेशनवर BJPचं आंदोलन, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी या मारहाण प्रकरणी रिक्षावाला फोरमचे 30 शिलेदार पोलीस स्टेशनमध्ये तळ ठोकून होते. या शिलेदारांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दखल पात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.
Published by:Pooja Vichare
First published: