Home /News /maharashtra /

राष्ट्रवादीत प्रवेश करणार? भाजप नेत्याच्या सूचक विधानामुळे नगरमध्ये चर्चेला उधाण

राष्ट्रवादीत प्रवेश करणार? भाजप नेत्याच्या सूचक विधानामुळे नगरमध्ये चर्चेला उधाण

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले नेते आणि आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.

संगमनेर, 17 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले नेते आणि आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले वैभव पिचड यांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया देत सध्या तरी 'घरवापसी' करणार नाही, असं स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करून मोठा खुलासा केला होता. विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे सुपूत्र वैभव पिचड हे भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे पिचड पिता पूत्र परत राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी राजकीय चर्चा रंगली होती, यावर आज न्यूज 18 लोकमतशी बोलताना वैभव पिचड यांनी खुलासा केला. कार्यकर्त्याच्या आत्महत्येनं मनसे गहिवरली,राज ठाकरेंची सर्व सैनिकांना भावनिक साद 'माझ्याशी कुणाचाही संपर्क नाही. मी आहे त्या घरी सध्या तरी सुखी आहे, त्यामुळे राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्न नाही' असं वैभव पिचड म्हणाले. वैभव पिचड यांनी आपण सध्यातरी भाजपमध्ये सुखी असल्याचे म्हणून गुगली टाकली आहे. त्यामुळे भविष्यात काय होईल, याचे संकेतच पिचड यांनी दिले आहे. त्यामुळे अहमदनगरच्या राजकारणात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ...आणि डोक्यावर कोसळली बाल्कनी, पाहा भीषण दुर्घटनेचा LIVE VIDEO दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपमधून कोणतेही आमदार आणि नेते पक्ष सोडून जाणार नाही, असा दावा केला होता. तसंच, महाविकास आघाडी पक्षातील आमदार बाहेर पडू नये म्हणून असं वक्तव्य केले जात आहे, असा पलटवारही पाटील यांनी केला होता.
Published by:sachin Salve
First published:

Tags: आमदार, भाजप, राष्ट्रवादी

पुढील बातम्या