मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कार्यकर्त्याच्या आत्महत्येनं मनसे गहिवरली, राज ठाकरेंनी सर्व सैनिकांना दिला भावानिक संदेश

कार्यकर्त्याच्या आत्महत्येनं मनसे गहिवरली, राज ठाकरेंनी सर्व सैनिकांना दिला भावानिक संदेश

सुनिलची सुसाईट नोट वाचून शहरातील मनसे कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.

सुनिलची सुसाईट नोट वाचून शहरातील मनसे कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.

सुनिलची सुसाईट नोट वाचून शहरातील मनसे कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले.

  • Published by:  sachin Salve

 

मुंबई, 17 ऑगस्ट : 'अखेरचा जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे' असं म्हणून नांदेडच्या मनसेचे शहराध्यक्ष  सुनिल ईरावार यांनी आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने राज्यातील आपल्या तमाम कार्यकर्त्यांना धीर देण्यात आला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील काही संवाद हा व्हिडिओ स्वरुपात अधिकृत सोशल अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओतून तमाम मनसेसैनिकांना भावनिक साद घालण्यात आली आहे.

'सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्यांमधून नेता घडविणारा किमयागार आपल्याकडे आहे, फक्त थोडा संयम आणि विश्वास ठेवा कारण मार्ग खडतर असला तरी ठाम आहे' असं भावनिक आवाहन मनसेकडून कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.

तसंच, 'सुनील ईरावार सारख्या उमद्या महाराष्ट्र सैनिकास गमावणं, हे हेलावून टाकणारं आहे' असं म्हणत मनसेकडून आपल्या कार्यकर्त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जमिनीसाठी शेतकऱ्याला धमकावले, भाजपच्या जिल्ह्याध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल

16 ऑगस्ट रोजी सुनील ईरावार या 27 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिल ईरावार हा शहरातील गोकुंदा परिसरात राहत होता. सुनिल हा मनसेच्या शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होता. सकाळी साडे सहाच्या सुमारास सुनिलने राहत्या घरात साडीच्या कपड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिलने वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी जिवन यात्रा संपवली. सुनिलने आत्महत्येपूर्वी एक सुसाईट नोट लिहून ठेवली होती. या नोटमध्ये त्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागितली.

'अखेरचा जय महाराष्ट्र'

यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझ्या मर्जीप्रमाणे आयुष्य संपवत आहे. तरी माझ्यामुळे कुणालाच त्रास देऊ नका.

राजसाहेब, मला माफ करा. आमच्या इथं पैसे आणि जात या दोन गोष्टींवर राजकारण आहे आणि दोन्हीही माझ्याजवळ नाही.

जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे

आई, पप्पा, काका, काकू, मोठी वहिणी, छोटी वहिणी, शिवादादा, शंकरदादा, पप्पूदादा, मला माहिती आहे मी माफ करण्याचा लायकीचा नाही, तरी तुम्ही मला सर्वजण मला माफ करशाल अशी आशा बाळगतो.

आई मला माफ करं,

तुझाच सुनिल

सुनिलची सुसाईट नोट वाचून शहरातील मनसे कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. सुनिलने आत्महत्या केल्यामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर आज मनसेच्या वतीने ही कार्यकर्त्यांना भावनिक साद घालण्यात आली.

First published:

Tags: मनसे