जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ...आणि डोक्यावर कोसळली बाल्कनी, पाहा भीषण दुर्घटनेचा LIVE VIDEO

...आणि डोक्यावर कोसळली बाल्कनी, पाहा भीषण दुर्घटनेचा LIVE VIDEO

...आणि डोक्यावर कोसळली बाल्कनी, पाहा भीषण दुर्घटनेचा LIVE VIDEO

बाल्कनी खालून जात असताना अचानक त्याच्या डोक्यावर बाल्कनी कोसळली आणि एक व्यक्ती गंभीर जखमी झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

जोधपूर, 17 ऑगस्ट : राजस्थान आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसानं थैमान सुरू आहे. जोधपूरमध्ये बलदेव नगर भागात एक दुर्घटना घडली आहे. या परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर एका इमारतीची बाल्कनी कोसळल्यानं दुर्घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जोधपूरमधील बलदेव नगर भागात पाऊस पडल्याने अचानक बाल्कनी कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. एक व्यक्ती या बाल्कनी खालून जात असताना अचानक त्याच्या डोक्यावर बाल्कनी कोसळली आणि गंभीर जखमी झाला.

जाहिरात

हे वाचा- दुकानं उघडलं म्हणून पोलिसांनी जमिनीवर आपटून केली बेदम मारहाण, VIDEO VIRAL या व्यक्तीला तातडीनं पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र तोपर्यंत मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं कहर केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे. भूस्खलन, इमारत कोसळणं, आणि अनेक घरं देखील वाहून गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: rajasthan
  • First Published :
जाहिरात
जाहिरात