पुणे, 29 जुलै: पुण्यातल्या (Pune) पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एक धक्कादायक घटना घडली आहे. गोल्डमॅन (Goldman) दत्ता फुगेचा (Datta Phuge) मुलगा शुभम फुगे (Shubham Phuge) याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Police) हत्या (Murder) केल्याप्रकरणी अटक केली आहे. शुभमनं कानशिलात मारल्याचा रागातून एकाची हत्या केली आहे. भोसरी परिसरात ही घटना घडली आहे. तीन तरुणांनी मिळूनच आपल्याच मित्राचा खून केला आहे. या घटनेनं पिंपरी चिंचवडसह पुणे शहर हादरलं आहे.
शुभम फुगे आणि अमन सुरेश डांगळे हे दोघं जण दारु पित बसले होते. दारु पिताना या दोघांमध्ये काही कारणावरुन वाद झाला. या वादात अमननं शुभमच्या कानशिलात लगावली. याचाच राग शुभमला अनावर झाला. त्यानं याच रागात इतर दोन मित्रांच्या साथीनं अमनची हत्या केली.
Corruption Case: अनिल देशमुखांविरोधात CBI ची मोठी कारवाई
सुरुवातीला वेगळं कारण पुढं आलं होतं. दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास अमनचा मृतदेह भोसरी गावठाण परिसरात आढळला होता. यानंतर पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केला. भोसरी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली, तेव्हा पाठीमागे शस्त्राचे वार होते. अमनचा मोबाईल तपासला तेव्हा मध्यरात्री दोन वाजता पत्नी आणि लातूरहून आणखी एकाचा फोन आला होता. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरु केला. मात्र तपासा दरम्यान शुभमच्या नावाचा देखील उल्लेख झाला. त्यानंतर पोलिसांनी शुभमसह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pimpari chinchawad, Pune, Pune crime, Pune crime news