जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोकणात राजकीय शिमगा? मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते लावणार हजेरी?

कोकणात राजकीय शिमगा? मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते लावणार हजेरी?

रत्नागिरी जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ Ratnagiri,Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 डिसेंबर : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. मागील सहा महिन्यांपासून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये तेढ निर्माण झाला आहे. पण आता रत्नागिरी जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते रत्नागिरीत जिल्ह्यातील विविध 700 कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन करणार आहेत. त्याच बरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या विविध विकास कामांचा आढावा दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित घेणार आहेत. यावेळी भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण पत्रिकेमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची नाव आहे. निमंत्रण पत्रिकेत स्थानिक खासदार विनायक राऊत आणि राजापूरचे आमदार राजन साळवी यांचीही नावे आहे. राजापुरातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पांवरूनही समर्थक आणि विरोधकांमध्ये रणकंदण होण्याची शक्यता आहे. (‘या’ समस्येवरचा उपाय नितीन गडकरींकडेही नाही; लोकसभेत व्यक्त केली खंत) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी जिल्ह्याची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे ग्राम दैवत श्री देव भैरी बुवा यांचे दर्शन घेऊन प्रशासकीय कामकाजाला सुरुवात करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरी शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाचे भूमीपूजन होणार आहे. त्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे लोकार्पण होणार आहे. (Uddhav Thackeray : त्या 19 बंगल्यांची चौकशी सुरू, हिवाळी अधिवेशनात नागपूर तापणार; सरकार ठाकरेंना घेरणार!) दौऱ्याच्या शेवटी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरी शहरात जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीच्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणात काही राजकिय समाचार घेणार का? याकडेच आता सर्वांचे लक्ष लागलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात