नागपुरात दारू विक्री सुरू होणार की नाही? तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

नागपुरात दारू विक्री सुरू होणार की नाही? तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

लॉकडाउन -3 मध्ये मुंबई, पुणे शहरासाठी जे नियम लागू आहेत तेच नियम नागपूर शहरासाठी लागू राहतील.

  • Share this:

नागपूर, 04 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लॉकडाउन करण्यात आलं होतं. आजपासून लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. राज्यातील ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमध्ये काही अटी शिथील करण्यात आल्या आहे.  परंतु, नागपूरमध्ये कोणत्याही अटी शिथील करण्यात आल्या नाही, अशी माहिती नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर देशभरासाठी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन जाहीर झाले आहे. लॉकडाउन 3.O मध्ये केंद्र आणि राज्य शासनाने झोननिहाय काही शिथिलता जाहीर केली आहे. मात्र, नागपूर शहर हे ‘रेड झोन’ मध्ये असल्या कारणाने इथं कुठलंही शिथिलता राहणार नाही, असं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - Lockdown 3.0 : या राज्यांमध्ये आजपासून उघडणार दारूची दुकानं, असे असतील नियम

दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये ज्या सवलती होत्या, त्याच कायम राहतील. सरकारी आस्थापना अथवा खासगी कार्यालयांना 30 टक्के कर्मचारी संख्या ठेवून कार्य सुरू करण्यास नागपुरात पुढील आदेशापर्यंत बंदी कायम राहील.

वाईन शॉप किंवा अन्य कुठलीही दुकाने नागपूर महानगरपालिका हद्दीत सुरू होणार नाहीत, असे आदेशात नमूद केले आहे. लॉकडाउन -3 मध्ये मुंबई, पुणे शहरासाठी जे नियम लागू आहेत तेच नियम नागपूर शहरासाठी लागू राहतील. त्यामुळे नागरिकांनी कुठलाही संभ्रम ठेवू नये, असंही मुंढे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा - VIDEO:आम्हाला तुमचा अभिमान आहे!'कोरोना योद्धा' डॉक्टरचं घरी असं झालं स्वागत

तसंच, लॉकडाउन-2 प्रमाणेच लॉकडाउन -3 मध्ये नियम लागू राहतील. हे सर्व नियम पाळत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन पाळावे, असे आवाहनही पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 4, 2020, 1:05 PM IST

ताज्या बातम्या