नवी दिल्ली, 04 एप्रिल : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या या तिसऱ्या टप्प्यात मात्र अनेक बदल करण्यात आले आहेत. ग्रीन आणि ऑरंज झोनमध्ये शहरांतर्गत व्यवहार आणि व्यापार करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. तर रेड झोनमध्ये अद्याप अत्यावश्यक सेवा वगळता बाकी गोष्टींना परवानगी देण्यात आली नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊन संपण्याची वाट पाहात असणाऱ्या तळीरामांना प्रश्न पडला आहे की दारूची दुकानं कधी उघडणार.
दारूची दुकानं उघडण्यासंदर्भात गृहमंत्रालयानं काही गाइडलाइन जारी केल्या आहेत. या गाइडलाइनुसार कंटेनमेंट झोन म्हणजेच कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी दारूची दुकाने उघडली जाणार नाहीत. रेड झोनमध्ये काही ठिकाणी तर ऑरेंज आणि ग्रीन या तीनही झोनमध्ये दारूची दुकाने उघडली जातील. पण या दुकानांमध्ये जाताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अत्यावश्यक असल्याचं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. मद्यपान करताना पान, गुटखा, तंबाखू इत्यादी सार्वजनिक ठिकाणी परवानगी दिली जाणार नाही. ग्राहकांमध्ये किमान सहा फुटांचं अंतर बाळगणं आवश्यक आहे. दुकानात एकावेळी पाचपेक्षा जास्त लोक नसावेत. जाणून घ्या कोणत्या राज्यांमध्ये आजपासून उघडणार दारूची दुकानं.
दिल्ली
L-6, L-8 सार्वजनिक क्षेत्रातील मद्य आणि दारूचे किरकोळ विक्रेत्यांना परवानगी दिली आहे.
कर्नाटक
कोरोनाग्रस्तांची संख्या ज्या परिसरात जास्त आहे तो भाग सोडून संपूर्ण राज्यात दारू विक्री सुरू केली आहे. मैसूर सेल्स इंटरनॅशनल लिमिटेड आणि MRP दुकानांना सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत मद्यविक्रीसाठी दुकानं उघडता येणार आहेत.
हे वाचा-
पुण्यात 69 प्रतिबंधित क्षेत्र घोषित, वाचा.. कुठे बंदी कायम तर कुठे मिळणार सूट
महाराष्ट्र
राज्यात आजपासून कंटेनमेंट झोन वगळता संपूर्ण राज्यात दारू विक्री सुरू होणार आहे. फक्त दारूच्या दुकानांमध्ये विक्रीसाठी निर्बंध हटवण्यात आले आहेत. मॉल, कॉम्प्लेक्स सारख्या ठिकाणी असणाऱ्या दुकानांवर बंदी कायम आहे.
आसाम
संपूर्ण राज्यातील दारूच्या दुकांनांना विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. देशी आणि विदेशी दोन्ही प्रकारचे ब्रॅण्ड विकण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
गोवा
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार गोव्यातही दारूची दुकाने उघडण्यात आली आहेत. गोवा लिकर डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता प्रसाद नायक यांच्या मते, राज्यात दारूची दुकाने सुरू झाल्यानंतरही पर्यटनावरील बंदीमुळे दारूची विक्री 70०% पर्यंत कमी होऊ शकते.
केरळ
केंद्राच्या आदेशानुसार राज्य सरकारने शनिवारी राज्यात दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोविड-19च्या आढावा बैठकीत केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले, "काळजी करण्याची गरज नाही. हे फक्त काही काळापुरते निर्बंध लावण्यात आले आहेत."
हे वाचा-
स्वगृही परतणाऱ्या कामगारांकडून तिकीट आकारू नये, उद्धव ठाकरेंची रेल्वेला विनंती
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.