मुंबई, 11 ऑक्टोबर : ‘मला पूर्ण विश्वास आहे आपण सत्तेत पोहोचू. तुमचे विचार सकारात्मक ठेवा. तुम्हाला सत्तेत घेऊन जाणार आहे. तुम्हाला म्हणजे तुम्हालाच सत्तेत नेणार मी स्वतः बसणार नाही’ असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तसंच, राज ठाकरेंनी पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचं बोलून दाखवलं आहे. मुंबई पालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मनसेची आज रंगशारदामध्ये महत्वाची बैठक पार पडली. यावेळी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अध्यक्ष राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. ‘मला पूर्ण विश्वास आहे आपण सत्तेत पोहोचू. तुमचे विचार सकारात्मक ठेवा तुम्हाला सत्तेत घेऊन जाणार आहे. तुम्हाला म्हणजे तुम्हालाच सत्तेत नेणार मी स्वतः बसणार’ नाही राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला (बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून अखेरच्या क्षणी निवडणूक आयोगाला ई-मेल, ‘ही’ 3 चिन्हं पाठवली!) ‘जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये निवडणुका लागतील आपल्याकडे आता ५ महिने आहेत. तुमचं पॉझिटीव्ह माईंड असलं पाहिजे. राज्यातील राजकारण खालच्या थराला जातंय. जे पेरलं जातंय ते तुमच्या डोक्यात जाता कामा नये. येणारी निवडणुक स्वबळावर लढायची आहे, असं विधान राज ठाकरेंनी या मेळाव्यात केलं आहे. (बाळासाहेबांऐवजी मोदी-शहांच्या नावाने चिन्ह मागा, अमोल मिटकरींचा टोला) ‘अंधेरीची पोटनिवडणूक होत आहे. पण अजून निर्णय नाही. ज्या ठिकाणी एखाद्या नेत्याचा मृत्यू होतो, त्याच्या निधनानंतर निवडणूक होत असेल तर अशा ठिकाणी उ मेदवार उभा करू नये, अशी परंपरा आहे. आम्ही सुद्धा तिथे आम्ही उमेदवार देत नाही. पाठिंबा कोणाला द्यायला हे ठरवू, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली. राज ठाकरे यांनी पॉझिटिव्ह मॅसेज दिला आहे. राजकारणात चिखल पाहायला मिळतोय, लोक या राजकारणाला कंटाळली आहे. पॉझिटिव्ह विचार करून लोकांमध्ये जा असा संदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे, असंही नांदवाकर यांनी सांगितलं. तर, उद्धव ठाकरेंकडे सहानभुती जातेय. कसली सहानभुती या लोकांनी जनतेशी प्रतारणा केली. वातावरण तसं नाही आहे लाखो लोकांनी हे दसरे मेळावे पाहिले सुद्धा नाही. अनेकांनी दसरे मेळावे पाहिले नाहीत. महापालिकेचा न भुतो असं यश मिळवायचे आहे. मी तुम्हाला विधानसभेत सत्तेत बसवणार आहे. लोकसेभत सत्तेत खासदार म्हणून बसवणार फक्त तुम्ही पॉझिटिव्ह राहा, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला असल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं.
वाद करू नका पहिला यश तर मिळू देत. नाक्यानाक्यावरं झेंडे लागले पाहिजेत. पुढेच पाच महिने रात्रभर काम केलं पाहिजे. लोकांना तुम्ही जोपर्यंत कवेत घेणार नाही तोपर्यंत लोकं कवेत तुम्हाला घेणार नाहीत. विजयापर्यंत कसं घेऊन जायचं ती जबाबदारी माझी, असंही राज ठाकरेंनी ठामपणे सांगितलं.