जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बाळासाहेबांऐवजी मोदी-शहांच्या नावाने चिन्ह मागा, अमोल मिटकरींचा टोला

बाळासाहेबांऐवजी मोदी-शहांच्या नावाने चिन्ह मागा, अमोल मिटकरींचा टोला

' नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करा, तुम्हाला ताकद दिसून येईल'

' नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करा, तुम्हाला ताकद दिसून येईल'

’ नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करा, तुम्हाला ताकद दिसून येईल'

  • -MIN READ Baramati,Pune,Maharashtra
  • Last Updated :

बारामती, 11 ऑक्टोबर : शिवसेनेला मशाल पक्ष चिन्ह मिळाल्यामुळे एकच जल्लोष केला जात आहे. तर शिंदे गटाकडून अजूनही पक्षचिन्हासाठी धावाधाव सुरू आहे. पण, ‘बाळासाहेब ठाकरे ऐवजी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करा, तुम्हाला ताकद दिसून येईल, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी बाळासाहेबांची शिवसेनेला लगावला आहे. आमदार अमोल मिटकरी आज बारामतीत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना मिटकरी यांनी शिंदे गटाला जोरदार टोला लगावला.

News18लोकमत
News18लोकमत

शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. शिवसेनेला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले आहे. असे असताना शिंदे गट ही बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची मागणी करून चिन्हाची मागणी करत आहेत. मात्र आमचे त्यांना आव्हान आहे की, बाळासाहेब ठाकरे ऐवजी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करा, तुम्हाला ताकद दिसून येईल, असा सणसणीत टोला अमोल मिटकरी यांनी बाळासाहेबांची शिवसेनेला लगावला आहे. (बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून अखेरच्या क्षणी निवडणूक आयोगाला ई-मेल, ‘ही’ 3 चिन्हं पाठवली!) ‘जनसंघ, काँग्रेस, या पक्षांनाही वेगवेगळी चिन्हे बदलावी लागली. त्यामुळे फारसा फरक पडला नाही. बाळासाहेब ठाकरे हे नाव ज्या ठिकाणी आहे. तेथे शिवसेनिकांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मशाल चिन्हालाच लोक पसंती देतील. मशाल हे जसे क्रांतीचे प्रतीक आहे. तसंच शिवसेनाही क्रांतीचे प्रतीक आहे. मित्रपक्ष म्हणून आमचा शिवसेनाला पाठिंबा असल्याचे मिटकरी यांनी सांगितलं. (नव्या चिन्हासोबतही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं जुनं नातं, मशाल आणि सेनेचा संबंध काय?) ‘राष्ट्रवादीने शिवसेना संपवली असा आरोप शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला होता. असा प्रश्न विचारला असता, यावर मिटकरी म्हणाले की, ‘याउलट माझा त्यांना प्रश्न आहे की, भावना गवळी, अडसूळ, प्रतापराव जाधव ही सर्व मंडळी ईडीच्या धाकाने शिंदे गटात जाऊन बसले. शिवतारे यांचे आता वय वाढले. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे’ असा पलटवार मिटकरींनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात