मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पत्नीने गाठला क्रूरतेचा कळस; प्रियकराच्या मदतीनं पतीला दिला भयंकर मृत्यू, दारू पाजून पाय तारेनं बांधले अन्...

पत्नीने गाठला क्रूरतेचा कळस; प्रियकराच्या मदतीनं पतीला दिला भयंकर मृत्यू, दारू पाजून पाय तारेनं बांधले अन्...

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Murder in Dhule: धुळे जिल्ह्यातील सोनगीर गावाजवळील एका विहिरीत बुधवारी एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा भयावह अवस्थेत मृतदेह आढळला (Dead body found in well) होता.

धुळे, 05 नोव्हेंबर: धुळे जिल्ह्यातील सोनगीर गावाजवळील एका विहिरीत बुधवारी एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा भयावह अवस्थेत मृतदेह आढळला (Dead body found in well) होता. अज्ञात मारेकऱ्यांनी मृत व्यक्तीचे पाय अॅल्युमिनियमच्या तारेनं घट्ट बांधून (tied legs with aluminium wire) त्याचे शरीरावर एक दगड दोरीने बांधला होता. अशा भयावह अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. बुधवारी हा मृतदेह विहिरीत आढळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृताची ओळख पटवली. ओळख पटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी हत्येचा उलगडा केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक (Wife and her boyfriend arrested) केली आहे. दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. निंबा रुपला पाटील असं हत्या झालेल्या 40 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते सोनगीर येथील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत निंबा पाटील यांच्या पत्नी अनिता यांचं गावातील शरद शाळिग्राम पाटील नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक प्रेमसंबंध सुरू होते. याच प्रेमसंबंधातून अनिताने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

हेही वाचा-गुप्तांगावर लाथ मारत शेजाऱ्याचं अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य; पुण्यातील घटना

जुन्या मुंबई-आग्रा महामार्गालगत सोनगीरपासून दोन किमी अंतरावर संजय येवले यांची शेती आहे. दरम्यान बुधवारी दुपारी येवले यांना आपल्या शेतातील विहिरीत एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मृतदेह आढळताच येवले यांनी शिंदखेडा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मारेकऱ्यांनी त्यांचे पाय अॅल्युमिनियमच्या तारेनं घट्ट बांधले होते. तसेच त्यांच्या अंगावर केवळ बनियान आणि अंडरवेअर होती.

हेही वाचा-17वर्षीय मुलीवर 17 जणांकडून गँगरेप; अनेक दिवस घरात डांबून सुरू होता भयावह प्रकार

याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, संबंधित मृतदेह सोनगीर येथील निंबा रुपला पाटील यांचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृत निंबा यांच्या पत्नी अनिता यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी पोलिसांना अनिता यांच्यावरच संशय आला. यामुळे पोलिसांनी अनिताची कसून चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी अनितासह तिचा प्रियकर शरद पाटील याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास शिंदखेडा पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Dhule, Murder