मराठी बातम्या /बातम्या /विदेश /17 वर्षीय मुलीवर 17 जणांकडून सामूहिक बलात्कार; अनेक दिवस घरात डांबून सुरू होता भयावह प्रकार

17 वर्षीय मुलीवर 17 जणांकडून सामूहिक बलात्कार; अनेक दिवस घरात डांबून सुरू होता भयावह प्रकार

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Rape on Minor Girl: एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 17 जणांनी सामूहिक अत्याचार (Minor Girl Gang Rape by 17 People) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नूरसुल्तान, 05 नोव्हेंबर: एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 17 जणांनी सामूहिक अत्याचार (Minor Girl Gang Rape by 17 People) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पीडित मुलीला निर्मनुष्य ठिकाणी नेत एका घरात डांबून ठेवलं होतं. याठिकाणी आरोपींनी पीडित मुलीवर सलग चार दिवस अत्याचाराचा कळस गाठला आहे. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे तक्रार दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. कायदेशीर कारवाईसाठी पाच महिने वाट पाहिल्यानंतर पीडितेनं अखेर सर्वांसमोर येऊन न्यायासाठी आपला आवाज उठवला आहे.

संबंधित घटना दक्षिण कझाकस्तानमधील (Southern Kazakhstan) एका शहरात घडली आहे. 'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, 17 वर्षीय पीडित मुलगी बाजारातून परत येत असताना, एका टॅक्सी चालकाने तिचं अपहरण (Minor girl kidnapped) केलं होतं. आरोपी टॅक्सीचालकाने पीडित मुलीला पाणी पिण्यास दिलं होतं. हे पाणी पिताच तिला गुंगी आली. ज्यावेळी तिचे डोळे उघडले, तेव्हा ती एका नदीकिनारी निर्मनुष्य ठिकाणी होती. तसेच तिच्या अंगावर कपडेही नव्हते. तर काही लोक तिच्याभोवती वर्तुळ करून उभे होते. संबंधित सर्वांनी पीडित मुलीवर अमानुष पद्धतीने अत्याचार केला.

हेही वाचा-36 तासात 5 हत्या; यमुना एक्सप्रेस-वेच्या कडेला आणखी 2 महिलांचे मृतदेह

नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडित मुलीला आणखी एका घरात घेऊन गेले. याठिकाणी आरोपीनं फोन करून आपल्या अन्य काही मित्रांना बोलावून घेतलं. याठिकाणी पीडित मुलीला चार दिवस घरात डांबून तिच्यावर अत्याचाराचा कळस गाठण्यात आला. संबंधित सर्व आरोपी पीडित मुलीवर आळीपाळीने चार दिवस अत्याचार करत होते. यानंतर आरोपींनी पीडित मुलीला धमकी देऊन सोडून दिलं.

हेही वाचा- प्रायव्हेट पार्टवर लाथ मारत शेजाऱ्याचं अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य; पुण्यातील संतापजनक घटना

नराधमांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडित मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत, सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच 17 आरोंपीना पीडित मुलींने ओळखूनही पोलिसांनी त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे पीडितेला सर्वांसमोर येऊन न्यायासाठी आवाज उठवावा लागला आहे. दुसरीकडे, याबाबत अधिक माहिती देताना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संबंधित सर्व आरोपींना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. पीडित मुलीच्या आईने सर्व पुरावे नष्ट केले आहेत. घटनेच्या वेळी मुलीने परिधान केलेले कपडेही जाळून टाकण्यात आले आहेत. तसेच पीडितेच्या आईने आरोपींकडून 13,750 पाउंडची रक्कमही घेतली आहे, असंही पोलिसांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Crime news, Gang Rape, Rape on minor