कोटा, 21 ऑक्टोबर: नवरा-बायकोमध्ये कधी आणि कोणत्या कारणावरून वाद (Husband wife hassle) होईल, हे काही सांगता येत नाही. किरकोळ कारणातून झालेला वाद अनेकदा विकोपाला देखील जातो. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये पतीने आवडीचा शर्ट शिवला (husband not sew her Favorite shirt) नाही, म्हणून एका महिलेनं गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट (Wife Commits suicide) केला आहे. एवढ्या किरकोळ कारणातून महिलेनं आपला जीव दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती माहिती पोलिसांना दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
संबंधित घटना राजस्थान (Rajasthan) राज्याच्या कोटा शहरातील आंवली-रोजडी परिसरात घडली आहे. तर अंजली सुमन असं आत्महत्या करणाऱ्या 23 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. मृत अंजलीचा विवाह दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील मंदसोर येथील रहिवासी असणाऱ्या शुभम सोबत झाला होता. शुभम हा एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला असून सध्या कोटा शहरातील आंवली रोजडी येथे वास्तव्याला होता.
हेही वाचा-विजेचा शॉक देत पत्नीची भयंकर अवस्था; दुसऱ्या बायकोच्या मदतीनं नवऱ्याचं कृत्य
घटनेच्या दिवशी मृत अंजलीने नवऱ्याकडे आपल्या आवडीचा शर्ट शिवून घ्यावा, यासाठी हट्ट केला होता. पण नवऱ्यानं संबंधित शर्ट शिवून घेण्यास नकार दिला. या किरकोळ कारणातून अंजली आणि शुभम यांच्यात वाद झाला. त्यामुळे दोघंही एकमेकांवर नाराज झाले. यामुळे घटनेच्या दिवशी शुभम घरी जेवण न करताच, ऑफिसला निघून गेला. ऑफिसला गेल्यानंतरही अंजलीनं शुभमला फोन केला होता. पण सायंकाळी घरी आल्यावर बोलू , अशी शुभमने समजूत घातली होती.
हेही वाचा-आई-वडील शेतात जाताच एकट्या मुलीवर साधला डाव; रेप आणि खुनाच्या घटनेनं नगर हादरलं!
त्यानंतर अवघ्या आर्ध्या तासांत अंजलीने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. शेजाऱ्यांनी पती शुभमला फोन करून याबाबत माहिती दिली असता, त्याच्या पायाखालची जमीनचं सरकली. दुसरीकडे, मृत अंजलीच्या नातेवाईकांनी पती शुभम विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अंजलीच्या आत्महत्येमागं नेमकं हेच कारण आहे की आणखी काही? याचा तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.