जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / धक्कादायक! संशयी पत्नीचं विकृत कृत्य; पतीला गावातील अल्पवयीन मुलीवर करायला लावला बलात्कार

धक्कादायक! संशयी पत्नीचं विकृत कृत्य; पतीला गावातील अल्पवयीन मुलीवर करायला लावला बलात्कार

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Rape in Wardha: वर्धा जिल्ह्याच्या आर्वी पोलीस ठाण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका महिलेनं आपल्या पतीला गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायला लावलं (wife forced husband to rape minor girl from same village) आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वर्धा, 27 डिसेंबर: वर्धा (Wardha) जिल्ह्याच्या आर्वी पोलीस ठाण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका महिलेनं आपल्या पतीला गावातील 14  वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायला लावलं (wife forced husband to rape on minor girl from same village) आहे. आरोपी महिलेनं संशयी वृत्तीतून हे धक्कादायक कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी दाम्पत्यास अटक (Accused couple arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. पीडित मुलगी घरी एकटी असल्याचं पाहून आरोपी महिला तिला आपल्या घरी घेऊन आली होती. पीडित मुलीला घरी आणल्यानंतर आरोपी महिलेनं तिला ‘तू माझ्या पतीसोबत लग्न कर’ असं म्हणत घरात पतीसोबत कोंडलं. घराचा दरवाजा बाहेरून बंद करून आरोपी महिला निघून गेली. पीडित मुलीला एकटं पाहून आरोपी पतीने तिच्यावर बळजबरी करत अत्याचार केला. हेही वाचा- हनीमूनच्या रात्री पतीला आला साडूचा फोन, म्हणाला ती फक्त माझीच; झाला खून काही वेळाने पत्नी घरी आली. यानंतर तिने पुन्हा एकदा डोळ्यादेखत पतीला पीडित अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यास भाग पाडलं आहे. या धक्कादायक प्रकारानंतर आरोपी दाम्पत्याने घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारेल, अशी धमकी पीडितेला दिली. आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर पीडित मुलीनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला आहे. हेही वाचा- भल्या पहाटे नदीकाठी नेत बापानेच 13 वर्षीय मुलाचा घोटला गळा, धक्कादायक कारण समोर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी आर्वी पोलीस ठाण्यात जात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. आरोपी महिलेनं नेमक्या कोणत्या कारणातून हा प्रकार करायला लावला, याची माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा तपास आर्वी पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात