Home /News /maharashtra /

भल्या पहाटे नदीकाठी नेत बापानेच 13 वर्षीय मुलाचा घोटला गळा, धक्कादायक कारण समोर

भल्या पहाटे नदीकाठी नेत बापानेच 13 वर्षीय मुलाचा घोटला गळा, धक्कादायक कारण समोर

Murder in Buldhana: साखरखेर्डा तालुक्यातील सवडद याठिकाणी एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलाची गळा आवळून निर्घृण हत्या (13 years old son brutal murder by father) केली आहे.

    बुलडाणा, 26 डिसेंबर: बुलडाणा (Buldhana) जिल्ह्याच्या साखरखेर्डा तालुक्यातील सवडद याठिकाणी एका 40 वर्षीय व्यक्तीने आपल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलाची गळा आवळून निर्घृण हत्या (13 years old son brutal murder by father) केली आहे. आरोपीनं भल्या पहाटे मुलाला शौचाच जायचं असल्याचं सांगून नदीकाठी घेऊन गेला होता. यावेळी बेसावध असलेल्या मुलाचा गळा आवळून आरोपी बापाने गळा आवळून हत्या केली आहे. यानंतर आरोपीनं मुलाचा मृतदेह नदीकाठच्या एका डबक्यात टाकून घरी आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अमर सिद्धेश्वर नेन्हई असं हत्या झालेल्या 13 वर्षीय मुलाचं नाव आहे. तर सिद्धेश्वर सखाराम नेन्हई असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी सिद्धेश्वर हा अपंग असून सवडद येथे आपल्या पत्नीसह मुलगी आणि मुलगा अमर यांच्यासोबत वास्तव्याला होता. भाजीपाला विकण्याचं काम करणाऱ्या आरोपी सिद्धेश्वरला दारूचं व्यसन होतं. तो नेहमी दारू पिऊन घरी यायचा आणि पत्नीसह मुलीला आणि मृत अमरला शिवीगाळ आणि मारहाण करायचा. हेही वाचा-जालना हादरलं, अपहरण करून दलित तरुणाची हत्या, आत्महत्येचा केला बनाव आरोपीचा स्वभाव चिडचिडा आणि भांडखोर असल्याने गावातील लोकंही त्याच्यापासून लांब राहत होते. 13 वर्षीय मुलगा अमर हा आपलं अपत्य नसल्याचा संशय आरोपी वडील सिद्धेश्वरला होता. या कारणातून तो नेहमी आपल्या बायकोसोबत वाद घालायचा. अमर हा आपल्या रक्ताचा नसल्याचा संशयातून त्याने आपल्या पत्नीला अनेकदा मारहाण केली होती. हेही वाचा-...अन् दोन गटांनी एकमेकांच्या घरांना लावली आग, दोन संसारं जळून खाक, कारण समोर दरम्यान घटनेच्या दिवशी शनिवारी पहाटे आरोपी सिद्धेश्वर याने शौचास जायचं असल्याचं सांगून अमरला कोराडी नदीपात्रात घेऊन गेला होता. या ठिकाणी गेल्यानंतर आरोपीनं बेसावध असलेल्या अमरचा गळा आवळला. अमरची हत्या केल्यानंतर आरोपीनं त्याचा मृतदेह नदीकाठी एका डबक्यात टाकला आणि घरी आला. घरी आल्यानंतर त्याने अमरची हत्या केल्याचं ओरडून सर्वांना सांगितलं. तेव्हा गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेताच, त्यांना एका डबक्यात अमरचा मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती साखरखेर्डा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Buldhana news, Crime news, Murder

    पुढील बातम्या