Home /News /crime /

हनीमूनच्या रात्री पतीला आला साडूचा फोन, म्हणाला ती फक्त माझीच; झाला खून

हनीमूनच्या रात्री पतीला आला साडूचा फोन, म्हणाला ती फक्त माझीच; झाला खून

नुकतंच लग्न झालेल्या पतीला एक फोन आला आणि त्याला त्याच्याच पत्नीपासून दूर राहण्याची तंबी मिळाली. या फोनमुळे एक खून झाला.

    भोपाळ, 26 डिसेंबर:  लग्नाच्या रात्री हनीमूनसाठी (Honeymoon) पती आणि पत्नी (Husband and Wife) एकत्र असताना अचानक पतीच्या मोबाईलवर एक फोन (Mobile call) आला. पलिकडून त्याचा साडू म्हणजेच मेहुणीचा नवरा बोलत होता. तुझ्यासोबत जिचं लग्न झालं आहे, ती फक्त माझी आहे. तिला हातही लावू नकोस, अशी तंबी (Threat) त्याने फोनवर दिली. या फोनमुळे पतीला जबर धक्का बसला आणि त्याच्या मनात बदल्याची भावना निर्माण झाली. पत्नी आणि साडू या दोघांनीही आपली फसवणूक केली असून त्यांना धडा शिकवण्याचा बेत त्याने मनात रचायला सुरुवात केली आणि लग्नाच्या एका वर्षानंतर संधी साधत हा बेत तडीस नेला. अशी घडली घटना मध्यप्रदेशातील आगर-मालवा परिसरात राहणाऱ्या सोहेलचं गेल्या वर्षी लग्न झालं होतं. त्याचा साडू म्हणजेच मेहुणीचा नवरा नूर मोहम्मद याची तीन लग्नं झाली होती. तिसऱ्या पत्नीसोबत तो राहत होता आणि काही महिन्यांपूर्वी तिच्या माहेरी राहायला आला होता. घरजावई म्हणून पत्नीच्या माहेरी राहणाऱ्या नूरच त्याच्या मेहुणीसोबत सूत जुळलं होतं आणि त्यांचप्रेमसंबंध निर्माण झाले होते. काही दिवसांनी नूरनं ते घर सोडलं मात्र त्याच्या मनात मेहुणीचं आकर्षण कायम होतं.  आखली खुनाची योजना मेहुणीचं लग्न झाल्यानंतर तिच्या पतीला फोन करून नूरने पत्नीपासून दूर राहण्याची तंबी दिली. आपल्याला आपल्याच पत्नीपासून दूर राहण्याची तंबी देणाऱ्या नूरचा काटा काढण्याचा निर्णय सोहेलनं घेतला. सोहेलच्या मुलाच्या एका कार्यक्रमात त्यानं नूरच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित केलं होतं. नूरच्या घरचे सर्वजण कार्यक्रमाला आले होते, मात्र नूर आला नव्हता. ही संधी साधत त्याने नूरला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.  असा केला खून आपला चुलत भाऊ जाफरला सोबत घेऊन सोहेल नूरच्या घरी गेला. तिथं एकट्या असलेल्या नूरवर त्याने गुप्तीनं सपासप वार केले आणि त्याचा खून केला. त्यानंतर ते दोघं घरी परत आले आणि हत्येसाठी वापरलेली गुप्ती वाटेत फेकून दिली. परत आल्यावर त्यांनी स्वतःचे कपडेही जाळून टाकले.  हे वाचा - पोलिसांनी लावला छडा खून झाला त्या वेळेत सोहेल घरातून गायब असल्याचं पोलिसांना समजलं. त्यांनी संशयाच्या आधारे चौकशी केली असता सोहेलनं गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सोहेल आणि त्याचा चुलत भाऊ जाफरला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Madhya pradesh, Murder

    पुढील बातम्या