जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'तुम्ही दारू पिऊन आईला का त्रास देता' म्हणत लेकाने बापावर केले कोयत्याने 10 वार, बीडमधील घटना

'तुम्ही दारू पिऊन आईला का त्रास देता' म्हणत लेकाने बापावर केले कोयत्याने 10 वार, बीडमधील घटना

आरोपी पवन हंकारे याने मयत वडील शिवाजी हंकारे यांना जवळबन येथून दुचाकीवर बसवून साळेगाव परिसरातील माळरानावर नेले. त्या ठिकाणी दोघे एकत्र दारू पिले.

आरोपी पवन हंकारे याने मयत वडील शिवाजी हंकारे यांना जवळबन येथून दुचाकीवर बसवून साळेगाव परिसरातील माळरानावर नेले. त्या ठिकाणी दोघे एकत्र दारू पिले.

आरोपी पवन हंकारे याने मयत वडील शिवाजी हंकारे यांना जवळबन येथून दुचाकीवर बसवून साळेगाव परिसरातील माळरानावर नेले. त्या ठिकाणी दोघे एकत्र दारू पिले.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 16 जून : “तुम्ही दारू पिऊन आईला का त्रास देता”, म्हणत पोटच्या मुलाने जन्मदात्या बापाच्या अंगावर  कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक  घटना बीडच्या (beed) साळेगाव परिसरातील माळरानावर घडली आहे. वडिलांची हत्या (father murder) केल्यानंतर आरोपी मुलगा (son) स्वतःच  पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी तात्काळ मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शिवाजी केशव हंकारे (वय 55 रा. जवळबन ता. केज) असं मयत व्यक्तीचे नाव आहे. तर पवन शिवाजी हंकारे (वय 26) असं आरोपी मुलाचे नाव आहे. आरोपी पवन हंकारे याने मयत वडील शिवाजी हंकारे यांना जवळबन येथून दुचाकीवर बसवून, साळेगाव परिसरातील माळरानावर नेले. त्या ठिकाणी दोघे एकत्र दारू पिले. त्यानंतर आरोपी पवन याने त्याचे वडील मयत शिवाजी हंकारे यांना, “तुम्ही दारू पिऊन आईला त्रास का देता? असा जाब विचारला. या दरम्यान दोघात बाचाबाची झाली आणि आरोपी पवन याने जन्मदात्या बापाच्या हातावर, पायावर, मानेवर आणि तोंडावर कोयत्याने सपासप 9 ते 10 वार केले. त्यामुळे अतिरक्तस्रावाने शिवाजी हंकारे याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी पवन याने मयत वडिलांचा मृतदेह, शेतातील सोयाबीनच्या भुसकटात झाकून लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी पवन हा स्वतःचं युसुफवडगाव पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने स्वतः वडिलांचा खून करून प्रेत केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत साळेगाव शिवारात लपवून ठेवले असल्याची माहिती दिली. ( मुलीच्या साखरपुड्यानंतर आईचच जावयाशी लग्न; 4 वर्षांनी हेल्पलाइनवर कॉल केला अन् ) पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेत मृतदेह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात जन्मदात्या बापाची हत्या करणाऱ्या आरोपी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( अरे देवा! कोरोना महासाथीत आणखी एका नव्या आजाराचा उद्रेक; चिंता वाढली ) दरम्यान, पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र ही परिस्थिती त्याच्यावर फक्त दारूमुळे आल्याची माहिती समोर आल्याने, या दारूपायी गाव खेड्यातील कुटुंब कसे उद्ध्वस्त होत आहेत? त्या कुटुंबातील कलह आज खुनापर्यंत जाऊन टेकला आहे. त्यामुळे अशा दारुवर सरकार आणि प्रशासनाने बंदी आणावी. अशी मागणी गाव खेड्यातील सर्वसामान्य नागरिकांनामधून होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात