Home /News /lifestyle /

अरे देवा! कोरोना महासाथीत आता Acute enteric epidemic; नव्या आजाराच्या उद्रेकाने चिंता वाढवली

अरे देवा! कोरोना महासाथीत आता Acute enteric epidemic; नव्या आजाराच्या उद्रेकाने चिंता वाढवली

कोरोनाच्या संकटात नव्या आजाराच्या उद्रेकामुळे सरकारचंही टेन्शन वाढलं आहे.

    प्योंगयांग, 16 जून : कोरोना महासाथीचं संकट अद्यापही टळलेलं नाही. उलट कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढू लागली आहेत. अशाच आता आणखी एका नव्या आजाराचा उद्रेक झाला आहे. दक्षिण कोरियात कोरोनापाठोपाठ एका नव्या आजाराने थैमान घातलं आहे. या आजाराची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे किंम जोंग यांनाही आता चिंता सतावू लागली आहे. ते स्वतः या आजाराशी दोनहात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत (New disease outbreak in North korea). रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार किंम जोंग यांनी बुधवारी हेजू शहरात एक्युट एंट्रीक एपिडेमिकने (acute enteric epidemic) ग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी औषधं पाठवली आहेत. या रुग्णांना त्यांनी आपल्या कुटुंबासाठी राखीव औषध असलेली औषधं मदत म्हणून दिली आहेत, अशी माहिती उत्तर कोरियाची न्यूज एजन्सी केसीएनएने दिली आहे. हा आजार किती खतरनाक आहे, याबाबत अद्याप माहिती नाही. पण तो पोट आणि आतड्यांवर हल्ला करत आहे. या आजाराचे किती रुग्ण आहेत याचीही माहिती नाही. काही तज्ज्ञांच्या मते, हा आजार टायफॉईड, कॉलरा यासारखाच जर्म्समुळे होणाराला आतड्यांचा आजार असावा. जो दूषित अन्न-पाणी आणि संक्रमित लोकांच्या मलमूत्राशी संपर्कात आल्याने होते. हे वाचा - चमचमीत Chole Bhature वर ताव मारताय तर सावधान! आधी हा Video जरूर पाहा शिवाय किम जोंग यांनी या आजाराला अधिकच गांभीर्याने घेतलं आहे. ज्या प्रमाणे कोरोनाव्हायरसला रोखण्यासाठी उपाय केले जात होते, तसेच उपाय करण्यावर किम जोंग यांचा जोर आहे. यामध्ये क्वारंटाइनचाही समावेश आहे. उत्तर कोरियात तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.गुरुवारी तापाचं लक्षण असलेल्या 26,010  लोकांची नोंद झाली आहे.  एप्रिल अखेरपर्यंत ताप आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 4.56 दशलक्ष होती.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Serious diseases, World news

    पुढील बातम्या