सुरत, 16 जून : साधरण दोन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये (Gujrat News) एक प्रकरण खुप चर्चेत होतं. ज्यात जावई आणि सासू मुलीचं लग्न होण्याआधी पळून केल्याची घटना समोर आली होती. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं होतं. काही दिवसांनंतर दोघेही परतले होते. आता गुजरातमधून अशीच एक घटना समोर आली आहे. या प्रकरणात ज्या तरुणासोबत मुलीचा साखरपुडा होणार होता, त्याच्यासोबत मुलीच्या आईने संसार थाटला. बनासकाठा येथील हैराण करणारी घटना… गुजरातचा सीमावर्ती जिल्हा बनासकांठामधील या प्रकरणाची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. ज्यात मुलीचं नातं तुटल्यानंतर तिच्या आईने आपल्या जावयासोबत संसार थाटला . हे सर्व प्रकरण समोर आल्यानंतर महिलेला तिच्या घरी घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मुलीसोबत ज्याचा साखरपुडा झाला, त्याच्यासोबत आईने संसार थाटला.. गुजरातच्या वृत्तपत्रातील एका बातमीनुसार, 181 अभयम हेल्पलाइन क्रमांकावर मदतीसाठी फोन आला होता. ज्यात महिलेने पतीकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार केली होती. महिलेच्या तक्रारीनंतर अभयमचे कर्मचारी महिलेच्या घरी पोहोचले. येथे महिलेबद्दल ऐकून कर्मचारीही हैराण झाले. 46 वर्षीय विधवा, 30 वर्षीय पुरुषासोबत राहत होती… अभयम या हेल्पलाइन क्रमांकाकडून मदत मागणारी महिला 46 वर्षांची होती. काही वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे महिला आपल्या मुलांसह राहत होती. साधारण 4 वर्षांपूर्वी महिलेच्या मुलीला एक स्थळ आलं होतं. सुरुवातीची बोलणी झाल्यानंतर लग्नाला होकार देण्यात आला. मात्र साखरपुड्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरुन वाद सुरू झाला. त्यामुळे दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. यानंतर कथेत ट्विस्ट आला. यानंतर मुलीच्या आईनेच होणाऱ्या जावयासोबत लग्न केलं. महिलेला तीन मुली आणि एक मुलगा… हे सर्व ऐकल्यानंतर महिलेला तिच्या मुलांकडे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. पहिल्या पतीपासून महिलेला तीन मुली आणि एक मुलगा आहे. सध्या महिलेची मुलं त्यांच्या आजीसोबत राहत आहेत. महिला गेल्या 4 वर्षांपासून या तरुणासोबत राहत होती. दोघांनी एका मंदिरात जाऊन लग्न केलं होतं. मात्र यानंतर पतीकडून तिला त्रास दिला जात होता. त्यामुळे आता मात्र ती मुलांकडे जायला तयार झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.