मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोण होणार नवा गृहमंत्री? शरद पवारांच्या गोटात मार्चमध्येच ठरला होता प्लॅन; या विश्वासू नेत्याचं नाव चर्चेत

कोण होणार नवा गृहमंत्री? शरद पवारांच्या गोटात मार्चमध्येच ठरला होता प्लॅन; या विश्वासू नेत्याचं नाव चर्चेत

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता गृहमंत्रिपदी कोण याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार नेहमीच्या धक्कातंत्राचा वापर करत अजित पवार, जयंत पाटील, राजेश टोपे या चर्चेतल्या नावांना फाटा देत वेगळंच नाव पुढे करण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता गृहमंत्रिपदी कोण याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार नेहमीच्या धक्कातंत्राचा वापर करत अजित पवार, जयंत पाटील, राजेश टोपे या चर्चेतल्या नावांना फाटा देत वेगळंच नाव पुढे करण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता गृहमंत्रिपदी कोण याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार नेहमीच्या धक्कातंत्राचा वापर करत अजित पवार, जयंत पाटील, राजेश टोपे या चर्चेतल्या नावांना फाटा देत वेगळंच नाव पुढे करण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 5 एप्रिल : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांच्या खंडणीखोरीच्या गंभीर आरोपांवरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh resigns) यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. परंतु, गृहमंत्र्यांची गच्छंती झाली तर पुढचा मोहरा कोण असणार याची चर्चा (who will be next home minister of Maharashtra) राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या महिन्यापासूनच सुरू होती. शरद पवार (Sharad pawar) यांनी आता या प्रकरणी अत्यंत सेफ गेम खेळत आपल्या सर्वात विश्वासू आणि संयमी नेत्याचं नाव पुढे केल्याचं वृत्त आहे.

    परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये पोलिसांमार्फत वसूल करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी कोर्टात याचिका दाखल होती. नी त्यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या जनहित याचिका तर डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या आहेत. याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील (Petitioner Dr Jaishri Patil) यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करतांना असे म्हटले होते की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी. याला न्यायालयाने दुजोरा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू असेपर्यंत पदावर राहणं योग्य नाही असं सांगत अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला.

    यानंतर आता पुढचे गृहमंत्री कोण याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रावादीच्या गोटात यापूर्वीच यावर विचारविनिमय झालेला आहे. पुढचे गृहमंत्री म्हणून अजित पवार, राजेश टोपे आणि जयंत पाटील यांची नावं मध्यंतरी चर्चेत होती.

    अजित पवार हे राष्ट्रवादीतले राज्यातले नंबर दोनचे नेते म्हणून ओळखले जातात. उपमुख्यमंत्रिपदाबरोबर गृहमंत्रिपद त्यांच्याकडे देण्यात यावं अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. पण शरद पवार त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता कमी आहे.

    राजेश टोपे यांची स्वछ प्रतिमा, कामाची धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते अशी ओळख यामुळे त्यांचं नाव चर्चेत होतं. शरद पवार यांचे विश्वासू  म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळे त्यांचं नाव गृहमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे.

    जयंत पाटील सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत. पण त्यांना गृहमंत्रिपदाचा अनुभव आहे. राष्ट्रवादीच्या गट तटात काही जणांचा त्यांच्या नावाला विरोध असल्याचं समजतं शिवाय गृहमंत्रिदी त्यांची नियुक्ती झआली तर पुन्हा प्रदेशाध्यक्ष कोण ते शोधावं लागेल.

    शरद पवारांचा सेफ गेम

    या पार्श्वभूमीवर सर्वांत सेफ गेम म्हणून दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची गृहमंत्री म्हणून जोरदार चर्चा आहे. दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शिवाय आतापर्यंत तरी वादापासून दूर राहणे त्यांना जमलेलं आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार आणि पक्षाकडून सुरू असल्याची माहिती आहे. याबाबत 'इंडिया टुडे'नं वृत्त दिलं होतं.

    वळसे पाटील का?

    यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली आणि भाजपने घेतलेले सर्व आक्षेप फेटाळून लावले. यामुळे महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

    अखेर अनिल देशमुखांची पडली विकेट, मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र आले समोर

    या सर्व पार्श्वभूमीवर कायमच संकटमोचक ठरलेले दिलीप वळसे पाटील हेच सध्या गृहमंत्रिपदासाठी योग्य पर्याय ठरू शकतील, असा मतप्रवाह राष्ट्रवादीत निर्माण झाल्याचं मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आगामी काळात याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकारबरोबरच राष्ट्रवादीची मलीन होऊ शकणारी प्रतिमा वाचवण्यासाठी  शरद पवार यांच्याकडून कोणता मोहरा पुढे येतो हे कळेलच.

    First published:

    Tags: Adv jayashree patil, Anil deshmukh, NCP, Resigns, Sharad pawar