मुंबई, 05 एप्रिल: महाविकास आघाडी सरकारमध्ये अखेर आणखी एका मंत्र्याची विकेट पडली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh resigned) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी (Parambir Singh) केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे देशमुखांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे.
हायकोर्टाच्या आदेशामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. अखेर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याबद्दल घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती दिली. 'मुंबई हायकोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांनी स्वत: हुन राजीनामा दिला आहे. ते लवकरच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहे', असं नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 5, 2021
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये पोलिसांमार्फत वसुली करण्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तसंच परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या जनहित याचिका तर डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका या सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या आहेत. याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील (Petitioner Dr Jaishri Patil) यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करतांना असे म्हटले होते की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी.
महाराष्ट्रातला डबल म्युटंट कोरोना विषाणू अमेरिकेत आढळला; पहिल्या रुग्णाची नोंद
या खटल्याची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे कि, अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने पोलिस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. अशा वेळी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात येते आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Hiren mansukh, Paramvir sing, Police action, Resignation, Sachin vaze