जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रिक्षाचालक ते शिवसेनेचे शक्तीशाली नेता! एकनाथ शिंदे यांची बंडखोरी पक्षाला का परवडणारी नाही

रिक्षाचालक ते शिवसेनेचे शक्तीशाली नेता! एकनाथ शिंदे यांची बंडखोरी पक्षाला का परवडणारी नाही

रिक्षाचालक ते शिवसेनेचे शक्तीशाली नेता! एकनाथ शिंदे यांची बंडखोरी पक्षाला का परवडणारी नाही

एकनाथ शिंदे हे आपल्या काही समर्थकांबरोबर महाराष्ट्राबाहेर गुजरात ( who is shivsena leader eknath shinde ) येथील सुरतमध्ये एका हॉटेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तर शिवसेनेला किती महागात पडू शकते? याचा घेतलेला मागोवा.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जून : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत (shivsena) राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. याचा फटका राज्यातील सरकारलाही बसू शकतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना पक्षात असं बंड पुकारण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी बंडखोरी करत पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांची बंडखोरी शिवसेनेला परवडणारी नाही. एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे आमदारांचं मोठं समर्थन असल्याचे बोलले जात आहे. ज्या ठाणे जिल्ह्यातून शिवसेना महाराष्ट्रभर पसरली. त्या जिल्ह्यात शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांच्यानंतर शिंदे यांचीच पकड आहे. यासोबत राज्यातील अनेक जिल्ह्यातील आमदार शिंदे यांचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांचा इथपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. चला यानिमित्ताने जाणून घेऊया. रिक्षाचालक ते मंत्री… रिक्षाचालक ते शिवसेना गटनेते असा एकनाथ शिंदेचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. आनंद दिघे यांच्या अपघाती मृत्यूनंतर जिल्ह्यात शिवसेना संपल्याचे चित्र असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख या नात्याने शिवसेना एकसंध ठेऊन मजबूत केली. यामुळे 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रथमच एकहाती सत्ता आली. तसेच, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, भिवंडी महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद, बदलापूर नगरपरिषद अशा सर्व ठिकाणी शिवसेनेला सत्ता मिळवण्यात हातभार लागला. राज्यातील विधानसभा निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांची मोठी भूमिका आहे. यामुळेच शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. यानंतर एकनाथ शिंदे यांचे पक्षातील वजन वाढले. मुख्यमंत्री ठाकरेंनी केलं डॅमेज कंट्रोल, एकनाथ शिंदेंचं बंड ठरणार पेल्यातलं वादळ? आनंद दिघे यांच्यामुळे राजकारणात.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यामुळे प्रभावित होऊन 1980 च्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे हे रिक्षा चालवून उदरर्निवाह करत होते. 1984 साली किसननगर येथे शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. सीमा आंदोलनात तुरुंगवास झाला. 1997 मध्ये पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड झाली. 2001 मध्ये सभागृहनेतेपदी निवड झाली होती. सलग तीन वर्षे पद सांभाळले. 2004 मध्ये तत्कालीन ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. 2005 साली शिवसेनेचे ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली. 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा आमदार झाले. 2014 साली विधानसभेसाठी विजयाची हॅटट्रिक केली. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. डिसेंबर 2014 मध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. हे आहेत नॉट रिचेबल आमदार एकनाथ शिंदे – कोपरी, अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद, शंभूराज देसाई – पाटण, सातारा, संदीपान भुमरे – पैठण, औरंगाबाद, उदयसिंह राजपूत – कन्नड, औरंगाबाद, भरत गोगावले – महाड, रायगड, नितीन देशमुख – बाळापूर, अकोला, अनिल बाबर – खानापूर, आटपाडी सांगली, विश्वनाथ भोईर – कल्याण(प), संजय गायकवाड - बुलढाणा, संजय रामुलकर - मेहकर, महेश शिंदे – कोरेगाव, सातारा, शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर, प्रकाश आबिटकर – राधानगरी, कोल्हापूर, संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ, ज्ञानराज चौघुले – उमरगा, उस्मानाबाद, तानाजी सावंत – पारंडा, उस्मानाबाद, संजय शिरसाट – औरंगाबाद(प), रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद, सुहास कांदे, नांदगाव, नाशिक, बालाजी कल्याणकर , नांदेड उत्तर, शांताराम मोरे, भिवंडी ग्रामीण, महेंद्र दळवी, अलिबाग, महेंद्र थोरवे, कर्जत हे आमदारा नाराज असल्याचे सांगण्यात आले आहे. 12 तासांच्या नाट्यानंतर एकनाथ शिंदेंचं सूचक ट्वीट, अखेर सेनेवरचं संकट टळलं? एकनाथ शिंदे यांची बंडखोरी सेनेला मोठा धक्का? एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची नावं वाचली तर लक्षात येईल की हे आमदार अपवाद सोडला तर नेहमी निवडून येणारे आहेत. त्यामुळे शिंदे यांची बंडखोरी सेनेला परवडणारी नाही. त्यामुळे वर्षा बंगल्यावरील शिवसेना बैठकीत एकनाथ शिंदे यांना मानसन्मानाने परत आणण्यासाठी प्रयत्नं सुरू आहेत. शिंदे यांना परत आणणार.. वर्षावर शिवसेनेची बैठक होत आहे. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व उपस्थित शिवसेना आमदार आणि खासदारांशी चर्चा केली. सर्वांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते असल्याचं म्हटलंय. त्यांना मान सन्मानाने बोलवावं आणि त्यांची समजूत काढावी. ज्या काही चूका झाल्या असतील त्या पुन्हा होणार नाही याची शाश्वती देऊ. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांच्या सर्व मागण्या पर्ण करू. शिवसेना पक्षातील बंडाळीचा फायदा इतर पक्षांना होता कामा नये. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची समजुत काढण्यासाठी शिवसेनेचं एक शिष्ट मंडळ सूरतला जाणार असल्याची माहिती आहे. शिष्टमंडळात शिवसेना सचिव अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक यांचा समावेश असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात