पुणे, 13 फेब्रुवारी: बीड जिल्ह्यातील परळीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने पुण्यामध्ये आत्महत्या (Pune Suicide) केल्याची घटना रविवारी घडली. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. यामध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीतील कथित मंत्र्याचे नाव घेतलं जात होतं. मात्र आता चित्रा वाघ यांनी थेट वनमत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी पूजाला (Pooja Chavhan) आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील अशीच चर्चा रंगताना दिसत आहे.
कोण होती पूजा चव्हाण?
पूजा चव्हाण ही बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी आहे. ती एक टीकटॉक स्टार होती. सोशल मीडियावर तिचे बरेच चाहते आहेत. पूजाला तिच्या समाजासाठी मोठं काम करायचं होतं. त्यासाठी पूजा विविध सामाजिक कामांत सहभाग घेत असत. तिला बंजारा समाजाच्या विकासासाठी काहीतरी भरीव कामगिरी करायची होती, ही बाब तिने अनेकदा आपल्या व्हिडीओमधून बोलून दाखवली होती.
पुण्याला का आली होती?
जग जिंकण्याचं स्वप्न असेल तर जगाची भाषा यायला हवी. आपली इंग्रजी भाषा फारशी चांगली नाही, त्यामुळे या बीडच्या महत्वाकांक्षी पोरीने इंग्रजी शिकण्यासाठी पुणं गाठलं होतं. इंग्रजी आलं तर आपण जग जिंकू आणि आपली छाप पाडू असं तिला वाटायचं. पण पुण्यात आल्यानंतर दोन आठवडेही झाले नसतील तोच तिने मृत्यूला कवठाळलं आहे. त्यामुळे बंजारा समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर सोशल मीडियावर याचे पडसाद उमटत आहेत.
तिच्या आत्महत्येनंतर जवळपास 12 ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या संवादावरून तिचे कथित मंत्र्यांशी प्रेमसंबंध असल्याचा संशय निर्माण होतं आहे. या ऑडिओ क्लिप राजकीय कार्यकर्ता अरुण आणि संबंधित शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यातील असल्याचा आरोप विरोध पक्षांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Girl death, Murder, Pune, Suicide