मुंबई, 13 फेब्रुवारी: आणखी एका तरुणीमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. पूजा चव्हाण (Pooja Chavhan) या 22 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येनंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर देखील एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर पुण्यात राहणाऱ्या या परळीतील तरुणीने आत्महत्या केल्याने पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील मंत्र्याकडे बोट दाखवण्यात येत आहे. याप्रकरणी काही ऑडिओ क्लिप (Viral Audio Clip) देखील व्हायरल होत आहेत. मीडिया अहवालांनुसार व्हायरल होणारं फोनवरील संभाषण एक कार्यकर्ता आणि मंत्री यांच्यामधील आहे. यामध्ये एक कार्यकर्ता एका मंत्र्याला सांगतो आहे की, तिच्या डोक्यातून आत्महत्येचं वेड काढून टाका, आत्महत्या पर्याय नाही, ती कितीतरी पोरींचं आयडल आहे, आत्महत्या करतेय म्हणजे अवघड आहे, तुम्ही तिला समजवा. एवढं बोलूनही तिच्या डोक्यात तोच विषय आहे, असा रिप्लाय समोरील मंत्र्याकडून दिला जातो. तो कार्यकर्ता असंही म्हणतोय की यावर ती ट्रीटमेंट करायला तयार आहे पण त्यानंतर ती आत्महत्या करणार असल्याचे त्याने मंत्र्याला सांगितले. यामध्ये तो कार्यकर्ता वारंवार त्या कथित मंत्र्याला आत्महत्या करण्याचा विचार तिच्या डोक्यातून काढा असं सांगताना दिसत आहे. ‘या’ देशात सर्रास केला जातोय महिलांवर बलात्कार, सरकारही मूग गिळून गप्प ही ऑडिओ क्लिप पूजाच्या आत्महत्येपूर्वीची आहे. दरम्यान तिच्या आत्महत्येनंतही एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये अरुण नावाचा कार्यकर्ता आणि कथित मंत्री यामधील संभाषण व्हायरल झाले आहे. यामध्ये अरुण नावाच्या कार्यकर्त्याला असे सांगितले जात आहे की तू दरवाजा तोड आणि तिचा मोबाइल काढून घे. मोबाइल त्यांच्या हाती लागून देऊ नको. हे संभाषण बंजारा भाषेत आहे. तिच्या आत्महत्येनंतर अरुण तिथेच उपस्थित असल्याचे समोर आले आहे. या समोर आलेल्या ऑडिओ क्लिप्स फॉरेन्सिककडून तपासण्यात येत आहेत. सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, या 22 वर्षीय तरुणीशी या मंत्र्याचे प्रेमसंबंध होते. तिने यातूनच आत्महत्या केल्याची चर्चा आहे. रविवारी मध्यरात्री पूजाने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप उलगडलं नसलं तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यामुळे खळबळ उडाली आहे. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. पूजा मुळची बीड जिल्ह्यतील परळी याठिकाणची आहे. तिचे आईवडीलही तिथेच राहतात. पूजा सोशल मीडियावर खूप सक्रीय होती, तिचे लाखो फॉलोअर्सही होते. तिला न्याय मिळावा अशी मागणी चव्हाण कुटुंबीय करत आहेत. नवऱ्याची बँक स्टेटमेंट्स मिळवणं पडलं महाग, मुंबईच्या महिलेची कोठडीत रवानगी भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचं नाव घेत उद्धव ठाकरेनां लक्ष्य केलं आहे संजय राठोड यांचं नाव घेत त्यांनी पूजाला आत्महत्येस प्रवृत्त केलं असा आरोप होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील हा मुद्दा उचलून धरला आहे. पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणात 12 ऑडिओ क्लिप्स हाती लागल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. याप्रकरण त्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत त्यात जोडल्याचे म्हटले आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये कुणाचा आवाज आहे, त्यातून पूजाने आत्महत्या केली की तसे करण्यात तिला प्रवृत्त केले गेले असे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.