adv जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणाचा संपूर्ण तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CBI कडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. हायकोर्टानं सीबीआयच्या प्रमुखांना या प्रकरणी तपास करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्यामुळं पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्याबाबत हायकोर्टानं शंकादेखिल उपस्थित केली होती. वाचा - कोण होणार नवा गृहमंत्री? शरद पवारांच्या गोटात मार्चमध्येच ठरला होता प्लॅन कोण आहेत अॅड. जयश्री पाटील? अॅडव्होकेट जयश्री पाटील यांचं नाव या प्रकरणापूर्वी मराठा आरक्षण प्रकरणीदेखील चांगलंच चर्चेत आलं होतं. त्या स्वतः मराठा समाजातल्या आहेत. तरीही मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका ही अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जयश्री पाटील यांच्या माध्यमातूनच दाखल केली होती. मराठा आरक्षणाला या याचिकेच्या माध्यमातून जयश्री पाटील यांनी विरोध केला आहे. हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टातही त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बाजू मांडलेली आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. एल. के. पाटील यांच्या जयश्री पाटील या कन्या आहेत. मानवाधिकारांबाबत त्यांचं काम असून त्यांनी या विषयावर आधारित अनेक पुस्तकं देखील लिहिली आहेत. तसंच मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी भूमिका बजावलेली आहे. वाचा - अखेर अनिल देशमुखांची पडली विकेट, मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र आले समोर देशमुखांवर हल्लाबोल दरम्यान न्यायालयाच्या निकालानंतर जयश्री पाटील यांनी अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला. तुम्ही कितीही मोठे मराठा नेते असाल किंवा शरद पवारांचा तुमच्यावर वरदहस्त असेल पण कायदा आणि संविधानापेक्षा तुम्ही मोठे नाही, असं जयश्री पाटील यांनी म्हटलं आहे. राज्यात मोगलाई नाही त्यामुळं तुम्ही कोणाला धमक्या देऊ शकत नसल्याचं म्हणत न्यायालयाच्या निर्णयावर त्यांनी आनंद व्यक्त केला.On petition of Dr Jaishri Patil, Bombay HC asks CBI to start a preliminary inquiry within 15 days into corruption allegations of former Mumbai Police Commissioner Param Bir Singh against Maharashtra Home Minister Anil Deshmukh. pic.twitter.com/qfdQV1Pis7
— ANI (@ANI) April 5, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Adv jayashree patil, Anil deshmukh, High Court, Hiren mansukh, Paramvir sing, Resignation, Sachin vaze, Sharad pawar