जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज्यपाल सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलले तेव्हा कुठे होता? रोहित पवारांचा भाजपला खोचक सवाल

राज्यपाल सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलले तेव्हा कुठे होता? रोहित पवारांचा भाजपला खोचक सवाल

राज्यपालांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या बाबत खालच्या पातळीवर वक्तव्य केले.

राज्यपालांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या बाबत खालच्या पातळीवर वक्तव्य केले.

राज्यपालांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या बाबत खालच्या पातळीवर वक्तव्य केले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बारामती, 19 नोव्हेंबर : ‘राज्यपालांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या बाबत खालच्या पातळीवर वक्तव्य केले. एका चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवला. त्यावेळी विरोधक शांत का होते? असा सवाल करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना विचारला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून राज्यभर राजकीय आखाडा तापला आहे. भाजप आणि मनसे आंदोलनं करत आहे. याच मुद्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद टीकास्त्र सोडले आहे. ‘माझा सावरकर यांच्या बाबतीतला अभ्यास नक्कीच कमी आहे. अभ्यास गरज आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या बाबतीत अभ्यास आहे त्यामुळे आपण लढतो. पण सावरकरांच्या बाबतीत चर्चा होणे आवश्यक आहे. त्यांनी लिहिलेले पुस्तकात नेमके काय मुद्दे आहेत हे लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. राहुल गांधींचा विरोध कमी होते पण शिंदे गटाचे काही लोक, भाजप आणि मनसे यामध्ये राजकारण करीत आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असं रोहित पवार म्हणाले. (Aditya Thackeray Yuva Sena : ठाकरे गटाची गळती काही थांबेना, आता युवासेनेत मोठं खिंडार) तसंच, राज्यपालांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या बाबत खालच्या पातळीवर वक्तव्य केले. एका चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवला. त्यावेळी विरोधक शांत का होते, असा सवालही रोहित पवारांनी भाजपला विचारला. (Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण) ‘भारत जोडो यात्रेत गेल्यानंतर मी त्यांना दोन वेळा भेटलो आदिशक्ती व भक्ती शक्तीची भेटवस्तू त्यांना दिली. उद्धव ठाकरे यांच्या फोटो संकलनाचे पुस्तक देखील त्यांना भेट दिले. ग्रामीण भागात सारखी शहरी भागात देखील रोजगार हमीची योजना यावी या आशयाचे निवेदन देखील मी त्यांना दिले पण ते सर्वांचे म्हणणे ऐकून घेतात लोक या येथे स्वयंपूर्ण सहभागी होत आहेत, असं म्हणत रोहित पवार यांनी राहुल गांधींच्या यात्रेचं कौतुक केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात