मुंबई, 19 नोव्हेंबर : शिवसेनेत उभी फुट पडल्याने शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन भाग झाले. दरम्यान शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे ठाकरे गटातील काही नेते कामानिमीत्त शिंदे यांना भेटल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण सुरू होत असते. दरम्यान काल (दि.18) अशीच एक घटना घडल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आणि एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यन नीलम गोऱ्हे हाॅटेलमध्ये गेल्यापासून त्या 30 मिनीटे असल्याने शिंदें यांच्यात आणि निलम गोऱ्हे यांच्यात चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यावरून नीलम गोऱ्हे शिंदे गटासोबत जाणार का? याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. परंतु गोऱ्हे यांनी याबबत खुलासा करत सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी माध्यमांशी चर्चा केली यावेळी त्या म्हणाल्या की, माझी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली हे मी मान्य करतो. मात्र ही भेट अचानक झाली आहे. यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये असे त्या स्पष्ट म्हणाल्या.
#आज लोकसभा @loksabhaspeaker जी मुंबई मे पधारे थे,ऊनका स्वागत पुष्प गुलदस्ता देकर किया।मैंने श्रद्धा वालकर के दर्दनाक हत्या के बारेमें निवेदन दिया ।स्पिकरजीने संवेदनशीलतासे मुझे सहयोग आश्वासित किया।ईस समय ऊन्हे मिलने के लिए @mieknathshinde @rahulnarwekar ऊपस्थित थे। @MahaDGIPR pic.twitter.com/eH4KQzP383
— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) November 18, 2022
हे ही वाचा : 'मी माझं पद दाखवलं तर बरीच लफडी बाहेर येतील'; गुलाबराव पाटलांच्या निशाण्यावर कोण?
मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेतली याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे यावर काय सांगाल असे विचारताच त्या म्हणाल्या की, मुळात तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती वेगळ्या स्वरुपात आलेली दिसते. मी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या भेटीसाठी गेले होते. ते सध्या मुंबईत आहेत. मी जेव्हा तिथे गेले तेव्हा 10 व्या मजल्यावर स्वत: मुख्यमंत्री आणि इतर लोक त्यांच्यापाशीच बसलेले होते, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
मला ओम प्रकाश बिर्ला यांना निवेदन द्यायचं होतं, शुभेच्छा द्यायच्या होत्या. तसेच काही विधीमंडळाचे विषय होते जे लोकसभा आणि विधीमंडळाच्या कार्यक्रमाशी संबंधित असून त्याबद्दल मी ओमप्रकाश बिर्ला यांच्याशी चर्चा केली. त्याठिकणी लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला आणि मुख्यमंत्र्यांचे बोलणे सुरू होते. त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आले. त्यांनी येऊन पुष्पगुच्छ दिला. अशापद्धतीची जनरल भेट होती. एकनाथ शिंदे तिथे होते ही वस्तूस्थिती आहे. मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली आणि मला करायचीही नव्हती, असं नीलम गोऱ्हेंनी सांगितलं.
हे ही वाचा : भाषणासाठी उभा राहताच लोकांनी खुर्च्या सोडल्या, अखेर नतमस्तक झाले चंद्रकांत खैरे
शिंदे गटात जाणार अशी चर्चा आहे, याबद्दल काय सांगाल? असा प्रश्नही नीलम गोऱ्हेंना या भेटीच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आला. तो मुळात योगायोग होता. मी जेव्हा भेटायला गेले तेव्हा मुख्यमंत्री तिथे होते. मुख्यमंत्री होते म्हणून माझी अपॉइटमेंट वगैरे असं कोणी करत नाही. तो भाग असतो व्यवस्थेचा म्हणून ते तिथे बसलेले होते. पण कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, असं नीलम गोऱ्हेंनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.