मुंबई, 19 नोव्हेंबर : ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे उघडपणे दिसत आहे. मागच्या चार महिन्यांपासून उद्धव ठाकरे सेनेवर आरोप करत अनेक मोठ्या नेत्यांनी शिवसेनेला नारळ दिला. ठाकरे गटाचे आऊगोईंग सुरू असताना आणखी एक धक्का शिवसेनेला बसला आहे. आता यंग ब्रिगेडही नाराज असल्याचे आता उघड झाले आहे. युवा शिवसेनेतील युवतीसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. युवती सेना सहसचिव शर्मिला येवले यांनी आपल्या समर्थकांसह युवती सेनेचा राजीनामा दिला आहे.
शिवसेनेमध्ये दोन गट पडले असल्याने नेत्यांसबोत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्येही फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा दोन्ही गटाकडून केला जात असला, तरी अद्याप त्याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही. यादरम्यान दोन्ही गटांमध्ये पक्षप्रवेश सुरु असून आपली बाजू भक्कम असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला युवा सेना पदाधिकारी धक्का दिला आहे.
हे ही वाचा : भाषणासाठी उभा राहताच लोकांनी खुर्च्या सोडल्या, अखेर नतमस्तक झाले चंद्रकांत खैरे
काय म्हणाल्या शर्मिला येवले
मागच्या काही दिवसात पक्षात जे सुरु आहे. त्यावर युवती सेनेच्या पदाधिकारी नाराज आहेत. अडचणीच्या काळात पक्ष सोडणं योग्य नाही पण पदाधिकारी राजीनामा देण्यावर ठाम आहेत. 35 पदाधिकारी युवतीसेना पदाचा राजीनामा देत आहोत, असं शर्मिला येवले यांनी यावेळी सांगितलं.
युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना वरुण सरदेसांचा फोन आला होता. त्यांनी फोन करून मुंबईत भेटीसाठी बोलावले आहे. आम्ही पदाधिकारी मुंबईत बैठकीला जाणार आहे. मात्र आम्ही राजीनामा देण्यावर ठाम आहोत, असं शर्मिला म्हणाल्या.
महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातूनही पदाधिकारी राजीनामा देणार आहे. शहर, तालुका, जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या तरूणी नाराज आहेत. तरूणी, महिला यांचा राजकारणातील वावर कमी आहे. सध्या ग्रामीण भागातही तरूणी पुढे येत आहेत. राजकारणात सक्रीय होत आहेत. ही चांगली आहे. पण नेतृत्व करताना स्थानिक पातळीवरील महिला-तरूणींना होणार त्रास लक्षात घेतला पाहिजे.
हे ही वाचा : औरंगाबादमध्ये झालेल्या अतिवृष्टीवेळी गायब असलेल्या खासदार जलील यांच्यावर पैशांचा पाऊस, VIDEO
पक्षातील वरिष्ठ नेते याची दखल घेत नाहीत. त्यामुळे युवा नेत्यांमध्ये नाराजी आहे, असे म्हणत शर्मिला यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.शर्मिला येवले या नीलम गोऱ्हे यांच्या निकटवर्तीय आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु असतानाच शर्मिला यांचा हा राजीनामा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)